बुधवार ठरला कोरोनाचा स्थिरवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:28+5:30

कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत जिल्ह्यातील १०५५ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६९ नमुने पॉझिटिव्ह आले असून २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर आत्तापर्यंत एकूण ९६१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

Wednesday was Corona's stable | बुधवार ठरला कोरोनाचा स्थिरवार

बुधवार ठरला कोरोनाचा स्थिरवार

Next
ठळक मुद्देनवीन रुग्णाची नोंद नाही : २५ स्वॅब नमुन्यांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा ६९ वर पोहचला आहे. मात्र आत्तापर्यंत एकूण ५० कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत १९ कोरोना बाधीत अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे. बुधवारी (दि.४) जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही तसेच एकही रूग्ण कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे बुधवार दिवस जिल्हावासीयांसाठी कोरोनाचा स्थिरवार ठरला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यांची सीमा तपासणी नाक्यावरच आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही प्रामुख्याने ग्रामीण भागातच अधिक असल्याने प्रशासनासह जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. बुधवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झाली नाही.
कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत जिल्ह्यातील १०५५ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६९ नमुने पॉझिटिव्ह आले असून २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर आत्तापर्यंत एकूण ९६१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात २४ क्रियाशील कंटेन्मेंट झोन
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रशासनातर्फे कंटेन्मेंट झोन घोषीत करुन तो परिसर सील केला जातो. सध्या स्थितीत जिल्ह्यात २४ क्रियाशील कंटेन्मेंट झोन आहेत. यात गोंदिया तालुक्यात नवरगाव कला, कटंगी, परसवाडा, चुटीया, रजेगाव व गजानन कॉलनी, काटी, सालेकसा तालुक्यात धनसुवा व बामणी, सडक अर्जुनी तालुक्यात तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव, पांढरवाणी, गोपालटोली, गोरेगाव तालुक्यात गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक, आंबेतलाव, तिरोडा तालुक्यातील तिरोडा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील करांडली, अरुणनगर, सिलेझरी, बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध शाळा आणि संस्थामधील क्वारंटाईन केंद्रात २७०२ जण दाखल आहेत. तर होम क्वारंटाईनमध्ये २२१६ जण आहेत.

Web Title: Wednesday was Corona's stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.