शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीच्या घाटांना अधिकृत डोंग्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: August 12, 2014 00:00 IST

तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तिरावरील अनेक गावांमधील नागरिकांना पैलतिरावर जाण्यासाठी डोंग्यांचा वापर करावा लागतो. परंतु गेल्यावर्षी डोंगा उलटून झालेल्या अपघातात १३ लोकांना

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तिरावरील अनेक गावांमधील नागरिकांना पैलतिरावर जाण्यासाठी डोंग्यांचा वापर करावा लागतो. परंतु गेल्यावर्षी डोंगा उलटून झालेल्या अपघातात १३ लोकांना जलसमाधी मिळाल्यानंतर यावर्षी जिल्हा परिषदेने डोंग्यांचा लिलाव केलाच नाही. त्यामुळे सध्या तीन घाटांवरून अवैधपणे वाहतूक सुरू आहे. मात्र त्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे वैनगंगेच्या घाटांना अधिकृत डोंग्यांची प्रतीक्षा लागली आहे.मागील वर्षी घाटकुरोडा नदी घाटावर जीर्ण झालेल्या डोंग्यातून पैलतिरी जाणाऱ्या १३ जणांना एकाचवेळी जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला होता. नवीन डोंगं खरेदी करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत अनेक दिवसांपासून ठेवण्यात आला होता. मात्र त्यावर कसलीही कार्यवाही न झाल्यानेच मृत्यूचे हे तांडव घडल्याचा आरोप झाला. यावर्षी जिल्हा परिषदेने नदी घाटांचा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला. तरीसुद्धा काही घाटांवरून अनधिकृतपणे प्रवाशांची ने-आण सुरू असल्याची माहिती आहे. हा प्रकार सर्रासपणे सुरू असून यावर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे धोका घडल्यास त्यासाठी जबाबदार कोण राहील? हा प्रश्न निर्माण होत आहे. तिरोडा तालुक्यात वैनगंगा नदीचे एकूण आठ घाट आहेत. या घाटांमध्ये घाटकुरोडा, मांडवी, चांदोरी, बिरोली, ढिवरटोला, करटी बु., चांदोरी खुर्द व पिपरिया यांचा समावेश आहे. या घाटांवरून पैलतिरी असलेल्या गावांत जाण्यासाठी अत्यंत कमी अंतर लागते. मात्र जिल्हा परिषदेने डोंगा वाहतुकीसाठी घाटांचा लिलाव न केल्याने ये-जा करण्यासाठी लोकांना कमालीचा त्रास होत आहे. या घाटांपैकी करटी बु., चांदोरी खुर्द व पिपरिया घाटांवरून अवैधरीत्या प्रवाशांची ने-आण केली जात असल्याची माहिती आहे. प्रवाशांचे प्रमाण जरी कमी असले तरी धोका उद्भवल्यास त्यासाठी जबाबदार कुणीही राहणार नाही. प्रवाशांनाही आता अधिकृत डोंग्यांची गरज असताना प्रशासनाने अद्याप घाटांचा लिलाव केला नाही आणि नवीन डोंगे उपलब्ध करून दिले, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रवाशांना लांब अंतराने फिरून जावून अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागतो. दुसरीकडे नावाड्यांनाही रोजगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांनीही काही घाटांवरून अवैध वाहतूक सुरू केल्याचे दिसून येत आहे. याबाबत तिरोड्याचे गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, लोकांना ये-जा करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता घाटांच्या लिलाव प्रक्रियेबाबत तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते, यावर सर्व अवलंबून आहे. जिल्हा परिषद मात्र य्हे काम करणार नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)