शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

वेतन देवरी रूग्णालयातून, काम मात्र गोंदियात

By admin | Updated: December 31, 2014 23:27 IST

देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात पदस्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्येश गुल्हाने यांचे येथील रूग्णांच्या कोणत्याही कामात न पडणे चर्चेचा विषय ठरत आहे. सदर अधिकारी देवरीच्या रूग्णालयातून वेतन घेतात,

देवरी : देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात पदस्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्येश गुल्हाने यांचे येथील रूग्णांच्या कोणत्याही कामात न पडणे चर्चेचा विषय ठरत आहे. सदर अधिकारी देवरीच्या रूग्णालयातून वेतन घेतात, मात्र काम गोंदियात करतात, असा देवरीवासीयांचा आरोप आहे.डॉ. गुल्हाणे देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात १ आॅगस्ट २०१४ रोजी रूजू झाले. त्यांना डेपुटेशनवर गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात बोलविण्यात आले. १ नोव्हेंबर २०१४ रोजी ते गोंदियाच्या रूग्णालयात रूजू झाले. परंतु वेतन घेण्यासाठी त्यांना देवरीत यावे लागते. देवरी राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे व या क्षेत्रात अपघातसुद्धा मोठ्या प्रमाणात होतात. अशात देवरीच्या रूग्णालयात हाडरोज तज्ज्ञाची अत्यंत गरज आहे. असे असतानाही त्यांना गोंदियात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. गोंदियाच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आधीपासूनच हाडरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. मनोज राऊत व डॉ. खतवार कार्यरत आहेत. अशात डॉ. गुल्हाने यांनी गोंदियाच्या रूग्णालयात गरज काय? ही न समजण्यापलीकडील बाब आहे. देवरीच्या तहसील कार्यालयाजवळ ३० डिसेंबर रोजी जखमी डॉ. लक्ष्मण शाहू यांचे पायाचे हाड तुटले. त्यांच्या उपचारासाठी एखाद्या हाडरोेग तज्ज्ञाची गरज होती. मात्र असे तज्ज्ञ देवरीत उपलब्ध नाहीत. दोन दिवसांपूर्वी रविवारी देवेंद्र तेजराम लांजेवार हे दुचाकीवरून पडल्याने त्यांचा खांदा सरकला. त्यांनासुद्धा हाडरोग तज्ज्ञाची उपचारासाठी गरज होती. परंतु डॉ. गुल्हाणे गोंदियाच्या रूग्णालयात असल्याने त्यांना आमगावच्या खासगी डॉक्टरकडून उपचार करून घ्यावा लागला. त्यासाठी त्यांना तीन हजार रूपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. विशेष म्हणजे देवरीच्या उपजिल्हा रूग्णालयात सध्या केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. डॉ. दीपक घुमनखेडे हे वैद्यकीय अधीक्षक आहेत. त्यांना इतर अनेक कार्यसुद्धा करावे लागतात. ३० डिसेंबर रोजी डॉ. घुमनखेडे यांनी कुटूंब नियोजनाच्या सहा शस्त्रक्रिया केल्या. तीन मृतदेहांचे उत्तरीय परीक्षणसुद्धा केले. एवढेच नव्हे तर ३० रूग्णांची तपासणीसुद्धा त्यांच्याच भरवशावर असते. अशात डॉ. गुल्हाणे यांची देवरीच्या रूग्णालयात गरज आहे किंवा नाही, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)