शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

भवभूती महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

By admin | Updated: September 29, 2014 23:08 IST

आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये मतदाराने आपला मतदानाचा हक्क प्रामाणीकपणे बजावून लोकशाही सुदृढ करण्यास हातभार लावावा असे आवाहन गोंदिया-भंडारा जिल्हा निवडणूक पर्यवेक्षक एल.मधुनाग केले.

आमगाव : आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये मतदाराने आपला मतदानाचा हक्क प्रामाणीकपणे बजावून लोकशाही सुदृढ करण्यास हातभार लावावा असे आवाहन गोंदिया-भंडारा जिल्हा निवडणूक पर्यवेक्षक एल.मधुनाग केले.भवभूती महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे निवडणूक आयोगाचे तसेच शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन एल.मधुनाग यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. भुस्कुटे, अतिथी म्हणून आमगावचे तहसीलदार राजीव शक्करवार, जिल्हा संपर्क उपायुक्त सरोदे उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात तहसीलदार राजीव शक्करवार म्हणाले की, गावागावात खेड्यापाड्यात तसेच शहरी भागातही मतदान करतांना उदासीनता दिसून येते. ही मानसिकता बदलून प्रत्येकाने इतरांनाही मतदानास प्रेरीत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. याप्रसंगी युवाशक्तीला अभिप्रेत असलेली ई-वोटींग प्रणाली व मतदानाची सक्ती या महत्वपूर्ण बाबी शासनाने गांभीर्याने घ्याव्या असे मनोगत महाविद्यालयीन विद्यार्थी जानू अग्रवाल व रामभरोस चक्रवर्ती यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भुस्कुटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, महाविद्यालयातील जवळपास ९० टक्के विद्यार्थी मतदानास पात्र आहेत. त्यानीच मतदार जनजागृतीचे महत्वपूर्ण कार्य आपल्या खांद्यावर घेवून गावखेड्यातील तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदानास प्रेरीत करावे जेणेकरून मोठ्या प्रमाणात मतदान होईल. मतदानाव्दारे लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या प्रक्रियेस भरघोष प्रतिसाद मिळेल. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रविण पठ्ठे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. विजय फुंडे, प्रा. शिंगाडे, प्रा. ठाकुर, प्रा. राणे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नायब तहसीलदार बागडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, प्रा. घोडे , प्रा. दाणी, शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)