शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

एकोपा जपतेय सीमेवरील गाव

By admin | Updated: October 30, 2014 22:53 IST

छोट्या-छोट्या कारणातून धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या आणि त्यातून समाजमन कलुषित होण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. पण जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या आणि छत्तीसगड सिमेपासून

धार्मिक सलोखा : हिंदू-बौध्दांची एकाच ठिकाणी पूजा मनिष मोटघरे - ककोडीछोट्या-छोट्या कारणातून धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या आणि त्यातून समाजमन कलुषित होण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. पण जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या आणि छत्तीसगड सिमेपासून अवघ्या दिड किलोमीटवर असलेल्या मुरमाडी या छोट्याशा गावाने मात्र धार्मिक सलोख्याचा अनोखा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या गावात चक्क हिंदू देवीदेवतांसोबत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचेही पुजन केले जाते.ककोडीपासून ४ किलोमीटर असलेल्या मुरमाडी या गावाची लोकसंख्या ८०० आहे. येथे गोंड (आदिवासी) समाजाचे, शिधार (कंवर), गोवारी, बौद्ध समाज आणि साहू समाजातील लोक राहतात. त्यात गोंड व शिधार समाजाचे लोक सर्वाधिक आहेत. पण गावात कधीही कोणत्या भांडण-तंट्याचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जात नाही. कोणात काही वाद झालाच तर तो गावाच्या सीमेबाहेर जाऊ न देता गावातच मिटविला जातो. गावकऱ्यांनी १० वर्षापूर्वी एका सामूहिक मंदिराची कल्पना मांडली आणि त्याला कोणीही आक्षेप न घेता सर्वांना ती कल्पना आवडली. गावाबाहेरच्या तळ्याकाठी असलेल्या ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेत मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पाहता पाहता गावकऱ्यांनी त्यासाठी लोकवर्गणी गोळा केली. सर्वांनी ऐपतीप्रमाणे आपला वाटा उचलला. जवळपास ३ रुपयांचा खर्च मंदिर उभारणीसाठी लागला. त्यासाठी गावकऱ्यांनी जमेल तेवढे श्रमदानही केले. शेवटी त्या मंदिरात वेगवेगळे गाभारे करीत त्या ठिकाणी कालीमाता, राम-लक्ष्मण-सीता, दुर्गादेवी, शंकराची मूर्ती आणि भगवान गौतम बुद्धाची मूर्ती स्थापित करण्यात आली. मंदिराच्या देखभालीसाठी एका पुजाऱ्याचीही नियुक्ती गावकऱ्यांनी केली. या गावात प्रत्येक धर्माचा सण-उत्सव एकोप्याने साजरा केला जातो. दुर्गाउत्सव, रामनवमी, बौद्ध पौर्णिमा, गुरू पौर्णिमा, मागी पौर्णिमा असे सर्व कार्यक्रम गावात सर्वजण मिळून साजरे करतात. एकोप्याचे प्रतिक झालेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी तत्कालीन सरपंच नामसिंग उईके, तत्कालीन पोलीस पाटील स्व.नारायण अट्टलखा, मुकूंद शहारे, प्रल्हाद सोनार, भगवान शहाडा, संतू ताराम, रामलाल मडावी, श्याम सोनार, भगवानसिंग केवास, माधव कुवरदादरा, कोदू सोनार, कमलेश सोरी, माखन कुंभरे, कीर्तन पायफूल, स्व.मंगलू सोरी (वैद्यराज) आदींनी पुढाकार घेतला होता.