गोंदिया : नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर साध्या पद्धतीने वाहनाचे क्रमांक लिहिण्याचा नियम असताना शहरात फॅन्सी नंबर प्लेट असणारे अनेक वाहन राजरोसपणे धावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यावर नंबरसुद्धा अशा पद्धतीने लिहिले असतात की त्यांना वाचणेसुद्धा अशक्य असते.
या प्रकाराने हे नंबर प्लेट आहेत की शो-पीस की प्रेमाचे स्लोगन हे सांगणेसुद्धा कठीण आहे. विशेष म्हणजे शहराच्या लोकसंख्या वाढीसह वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. युवा वर्गाची आवडही दुचाकी वाहनांकडे तीव्रतेने वाढत आहे. परंतु युवा वर्ग निमयांचे उल्लंघन करून विविध पद्धतीचे डिझाईन असणारे नंबर प्लेट आपल्या वाहनांवर लावत आहेत.
वाहनांच्या नंबर प्लेटशी छेडछाड केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद आहे, ही बाब शहरातील अधिकतर युवकांना माहीतच नाही. दुसऱ्या-तिसऱ्या वाहनांचे नंबर चित्रविचित्र ढंगाने लिहिले असते. ते समजण्यासच तीन-चार मिनिटांचा अशा अनेक गाड्यासुद्धा चालत आहेत की त्यांच्या नंबर प्लेटवरून नंबरच नष्ट झाले आहेत. अनेक वाहनांवर चुकीच्या पद्धतीने नाव व स्लोगन लिहिलेले आढळते.
सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पाहिले तर ही सर्वात मोठी धोक्याची घंटी आहे. यावरून वाहतूक किती योग्य पद्धतीने सुरू आहे, याचा अंदाज बांधला जावू शकतो. गोंदिया शहरात तर वाहतूक विभाग केवळ मूकदर्शक बणूण आहे. अशा फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
नंबर प्लेटमध्ये बदल किंवा ते फॅन्सी असणे यामुळे अपघात करून पळून जाणाऱ्या आरोपीच्या वाहनाचे नंबर माहीत होत नाही, ही मोठीच समस्या आहे.
अशाप्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीने नंबर स्पष्ट दिसण्यसाठी ते योग्य पद्धतीने लिहिले असणे गरजेचे आहे. शहराच्या वाहतूक विभागाचे श्रीराम सिंगणजुडे यांनी सांगितले की, फॅन्सी नंबर प्लेट वाहन धारकांवर मोटार वाहन नियम ४१/१७७ अन्वये १०० रूपये दंडाची तरतूद आहे. या अधिनियमानुसार, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास २५ फुट दूर अंतरावरून वाहनाचे नंबर स्पष्ट दिसायला हवे.
काही वाहन धारक यासाठीसुद्धा आपल्या वाहनांवर नंबर लिहीत नाही, कारण त्यांना गाडी विक्री करतेवेळी सुविधा होते. (प्रतिनिधी)
वाहनांचे नंबर प्लेट झाले शो-पीस
By admin | Updated: December 18, 2014 22:58 IST
नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेटवर साध्या पद्धतीने वाहनाचे क्रमांक लिहिण्याचा नियम असताना शहरात फॅन्सी नंबर प्लेट असणारे अनेक वाहन राजरोसपणे धावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
वाहनांचे नंबर प्लेट झाले शो-पीस
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}