शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

३.५ लाख नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २,३२,६१३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. ७२,६४४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याचे दिसत आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १,४२,५३८ नागरिकांनी लस घेतली आहे. तर, ६० वर्षांवरील वयोगटातील ९६,२९५ नागरिकांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण वेग घेत असून नागरिकांनी आता स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. 

ठळक मुद्देलसीकरण मोहीम जोमात : आता नागरिकांनी पुढे येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शासन लसीकरणावर जोर देत असून यासाठी नवनवे उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातही लसीकरणासाठी मोहीम राबविली जात असून केंद्रांची संख्या वाढवून शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. याचे फलित आहे की, शुक्रवारपर्यंत (दि.११) जिल्ह्यातील ३,०५,२५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर, ज्यांचे लसीकरण झाले नाही, अशांनी आता स्वत: पुढे येण्याची गरज आहे. मागील वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी कुणाकडेही काहीच औषध नव्हते. परिणामी, कोरोनाने मागील वर्षी चांगलीच जीवितहानी केली होती. मात्र, यावर्षी कोरोनाशी लढण्यासाठी देशात २ लसी तयार करण्यात आल्या असून त्यांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल व मे महिन्यांत कहर करून कित्येकांचे जीव घेतले. यात मात्र लसीची सुरक्षितता व तिचे परिणाम जाणून घेता आले. म्हणूनच, शास्त्रज्ञांनी कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शासन लसीकरणावर जोर देत आहे. जिल्ह्यातही १०० टक्के लसीकरण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणाची मोहीम राबविली जात असून यासाठी शहरासह ग्रामीण भागात केंद्रांची संख्या वाढविली जात आहे. शिवाय, जनजागृती करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जात आहे, जेणेकरून जास्तीतजास्त व लवकरात लवकर जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण व्हावे. यामुळेच लसीकरणाला आता जोर येत असून शुक्रवारपर्यंत (दि. ११) जिल्ह्यात ३,०५,२५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

२,३२,६१३ नागरिकांनी घेतला पहिला डोस- जिल्ह्यात आतापर्यंत २,३२,६१३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. ७२,६४४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याचे दिसत आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १,४२,५३८ नागरिकांनी लस घेतली आहे. तर, ६० वर्षांवरील वयोगटातील ९६,२९५ नागरिकांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण वेग घेत असून नागरिकांनी आता स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. १८-४४ वयोगटात आनंद -येत्या २१ तारखेपासून १८-४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण केले जाणार आहे. यामुळे या गटातील तरुण व युवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मध्यंतरी, देण्यात आलेल्या परवानगीनंतर या वयोगटातील ११,५५६ जणांनी पहिला, तर २९९१ जणांनी दुसरा म्हणजेच एकूण १४,५४७ जणांनी लस घेतली आहे. आता २१ तारखेपासून लसीकरणाला सुरुवात होत असल्याने त्यांची सोय होणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या