संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

By Admin | Updated: December 6, 2014 22:50 IST2014-12-06T22:50:49+5:302014-12-06T22:50:49+5:30

महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.याचा थेट फटका सालेकसा तालुक्यातील एकूण ४३ ग्राम पंचायतीच्या कामकाजाला बसला आहे.

The unauthorized work of computer operators started off the movement | संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

सालेकसा : महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.याचा थेट फटका सालेकसा तालुक्यातील एकूण ४३ ग्राम पंचायतीच्या कामकाजाला बसला आहे. सर्व ठिकाणी संगणकाशी संबधीत सर्व कामे ठप्प झाली आहेत.
या परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सामान्य जनतेच्या दैनंदिनी कामावर झालेला दिसत आहे. काम बंद ठेवण्याचे निवेदन सालेकसा तालुक्यातील संगणक परिचालकांनी खंडविकास अधिकारी विजय पचारे यांना दिले.
१ एप्रिल २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये संग्राम कक्षाची स्थापना करून त्यासाठी शासन निर्णयानुसार ग्राम पंचायतीमध्ये संगणक परिचालकाची नियुक्ती केलेली आहे. आज अखेर सर्व संगठन परिचालक प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने संगणक कक्षाचे काम मिळणाऱ्या मोबदल्यावर पडेल ते काम पूर्ण करीत आहेत.
मात्र त्यांच्या असहाय्यपणाचा गैरफायदा घेत ८ हजार ८२४ रुपयाऐवजी प्रत्येकी ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० इतकेच देण्यात आले. त्याचप्रमाणे संगणक देखभाल दुरूस्ती व इतर साहित्य वेळेवर मिळत नाही. त्याचाही मानसिक त्रास सहन करावा लागतो.
एकंदरीत कंपनीच्या वतीने शासनाच्या व जनतेच्या पैसाच्या दुरूपयोग दोन आहे. संगणक परिचालकावर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात बेमुदत आंदोलन संगणक परिचालकांनी सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The unauthorized work of computer operators started off the movement