शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही

By admin | Updated: November 26, 2015 01:41 IST

गोंदिया नगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला मागील दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही.

प्रभारीचीही बदली : पालिकेचा प्राथमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर गोंदिया : गोंदिया नगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला मागील दोन वर्षांपासून प्रशासन अधिकारी नाही. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर विभागाचा कारभार चालत होता. मात्र त्यांची जून महिन्यात बदली झाल्याने प्रशासन अधिकाऱ्यांचे पद रिक्त पडून आहे. यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार वाऱ्यावर असून याचा दुष्परिणाम शाळांच्या कारभारावर पडत आहे. पालिकेच्या शाळांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. मोजकेच विद्यार्थी असल्यामुळे शाळा बंद करण्याची पाळी नगर परिषदेवर आली आहे. याला पालिका प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार आहे. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांचे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त पडून आहे.तत्कालीन प्रशासन अधिकारी मदारकर हे सन २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले व तेव्हापासूनच त्यांचे पद रिक्त पडून आहे. ते सेवानिवृत्त झाल्यावर प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार तिरोडाचे एस.एस.ठाकरे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासन अधिकाऱ्यांचा कारभार प्रभारी अधिकारी चालवित होते. मात्र दोन्ही ठिकाणचे काम सांभाळताना त्यांची तारांबळ होत होती. परिणामी ते आठवड्यातून काही दिवस येथे येत होते. अशात एक ना धड भाराभर चिंध्या हीच गत प्राथमिक शिक्षण विभागाची झाली होती.दोन लिपीक व दोनच शिपाई विभागात आजघडीला दोन लिपीक व दोन शिपाई आहेत. यातील कनिष्ठ लिपीक पराते हे सध्या सुटीवर आहेत, तर दुसऱ्या लिपीक वासनिक यांच्याकडे बालकल्याण विभागाचा प्रभार आहे. यामुळे शिक्षण विभागात त्यांचे दर्शनच होत नाही. अशात शिपायांकडून विभागातील कामे करवून घेण्याची पाळी आली आहे. पराते यांच्याकडे विभागातील सर्व माहिती असते. मात्र ते सुटीवर गेल्यावर माहिती देणारा येथे कुणीच दिसून येत नाही.