लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : आमगाव-देवरी या राज्य मार्गावरील बोरकन्हार गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटीने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक ठार झाला. ही घटना आज (दि.२२) रोजी सकाळच्या सुमारास घडली. निलेश निलकंठ आसोले (२२) रा. मुल्ला ता. देवरी असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. निलेश आसोले हा आमगावकडे दुचाकीने आमगावकडे येत होता. दरम्यान गोंदियाकडून नागपूरकडे जाणाऱ्या एस.टी.ने बोरकन्हार जवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. यात निलेशचा जागीच मृत्यु झाला. पोलिसांनी एस.टी. वाहन क्रमांक एम.एच.४०, ८९४९ या वाहन व वाहन चालकाला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}