शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीसाठी जाणाऱ्या दोन आरोपींना अटक

By admin | Updated: March 30, 2016 02:07 IST

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील कोकणा परिसरात ८ ते १० लोक गावठी कुत्र्यांसह हातात कुऱ्हाड व काठ्या घेऊन शिकारीसाठी जात असतानाच...

सहा फरार : राष्ट्रीय उद्यानात गस्ती पथकाची कारवाईनवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील कोकणा परिसरात ८ ते १० लोक गावठी कुत्र्यांसह हातात कुऱ्हाड व काठ्या घेऊन शिकारीसाठी जात असतानाच त्यांना रात्री ११ वाजता वन्यजीव विभागातील गस्ती पथकाने अटक केली. मात्र त्यापैकी २ लोकांनाच अटक करण्यात यश आले असून ६ जण फरार झाले. त्यांची नावे कळाली असून त्यांना हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.सदर लोक शिकारीसाठी जात असल्याचे कळल्यानंतर गस्ती पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तिकडे मोर्चा वळविला. यावेळी आरोपींनी प्राणघातक हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मात्र काही कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. त्या ८ आरोपींमधून पुरूषोत्तम उरकुडा कोहळे (५०), भोजराम लक्ष्मण मडावी (४९) यांना पकडण्यात यश आले. उर्वरीत सहा आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पसार झालेल्या आरोपीमध्ये भागवत अर्जुन कुभरे, सेवक शिवाजी कोहळे, देवदास धनराज गजबे, कैलास मनोहर मुरखे व धनराज भागवत डोंगरवार यांचा समावेश आहे. सदर आरोपी वांगी येथील आहेत. त्यांच्यावर वन्य (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, २७ (१), ३१, ५० (१), ५१ व ३५ (६) अन्वये कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी गिता पवार, वनपरिक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक एम.व्ही.पाटील, डी.डी.मेश्राम, नवघरे, भदाने, नागपुरे, जोशी व सूर्यवंशी यांनी केली. अटकेत असलेल्या दोन आरोपींना ७ दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.(वार्ताहर)