शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गाड्या हळूहळू येत आहेत रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

गोंदिया : मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेची प्रवासी वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती. ...

गोंदिया : मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेची प्रवासी वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती. त्यानंतर काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र अजूनही रेल्वे गाड्या पूर्णक्षमतेने धावत नसून लोकल आणि पॅसेंजर गाड्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच आता रेल्वे विभागाने हळूहळू का होईना काही गाड्या सुरू करण्यास प्रारंभ केल्याने रेल्वे वाहतूक रुळावर येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

राज्यात सर्वत्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याने रेल्वे विभागाने सुद्धा काही मार्गांवर रेल्वे गाड्या सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. याच अंतर्गत ४ जुलैपासून शिवनाथ एक्स्प्रेस व इंटरसिटी एक्स्प्रेस ही नियमित सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नागपूर ते बिलासपूरला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या या मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण होत्या. आता ही गाडी नियमित सुरू होणार असल्याने नागपूरहून बिलासपूर आणि बिलासपूरहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. तर गोंदिया, रायपूर, भंडारा, दुर्ग, राजनांदगाव या रेल्वे स्थानकावर या गाडीचे थांबे असल्याने तेथील प्रवाशांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. १ जुलैपासून बऱ्याच रेल्वे गाड्या सुरू होण्याचे संकेत रेल्वे विभागाकडून दिले जात आहे.

............

गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाटची गाडीची प्रतीक्षा

मागील दीड वर्षांपासून गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट या पॅसेजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच या मार्गावरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवाय त्यांना अतिरिक्त भुर्दंड सुद्धा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.