शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

कुठेही गाडी लावा, नो प्रॉब्लेम!

By admin | Updated: December 31, 2014 23:25 IST

सध्या गोंदिया शहरात कोणीही यावे, कुठेही आणि कितीही वेळ गाडी उभी करावी, कोणी काही म्हणणार नाही. हे चित्र चक्क वर्दळीच्या मार्केट परिसरातही आता सर्रास पहायला मिळत आहे.

अनियंत्रित वाहतूक व्यवस्था : छत्तीसगड-मध्य प्रदेशातील वाहनांचा शहरात धुमाकूळगोंदिया : सध्या गोंदिया शहरात कोणीही यावे, कुठेही आणि कितीही वेळ गाडी उभी करावी, कोणी काही म्हणणार नाही. हे चित्र चक्क वर्दळीच्या मार्केट परिसरातही आता सर्रास पहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था किती अनियंत्रित झाली याचा प्रत्यय यातून येत आहे.व्यापारी शहर असलेल्या गोंदियात वर्षातील बाराही महिने वर्दळ असते. त्यातल्या त्यात नेहरू चौक ते दुर्गा मंदिर आणि गांधी चौक ते श्री टॉकीज चौक या मुख्य बाजारपेठेत कायम विविध खरेदीदारांची गर्दी असते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदियाच्या मार्केटमध्ये सर्वच प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी जिल्हाभरातूनच नाही तर लगतच्या इतर जिल्ह्यातूनही लोक येत असतात. यात लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्यातील चारचाकी वाहनांचीही वर्दळ मार्केट परिसरात नेहमीच असते. आपल्या कारने आलेले सुखवस्तू घरातील लोक मार्केटमध्ये खरेदी करीत असताना कार मात्र वाटेल त्या ठिकाणी पार्क करताना दिसतात. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या मार्केटमधील रस्त्यांवर वाहतुकीस मोठा अडथळ निर्माण होतो. त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. मात्र खोळंबलेली वाहतूक नियंत्रित करण्यासाठी किंवा रस्त्यात उभे असलेले वाहन हटविण्यासाठी कधीही वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी पुढे आलेले दिसत नाहीत.स्टेशन रोड, गोरेलाल चौक, बजाज पुतळा, नेहरू चौक अशा वर्दळीच्या स्थळीही बिनधास्तपणे ‘सीजी’ (छत्तीसगड) आणि ‘एमपी’ (मध्यप्रदेश) पासिंगच्या कार ठिकठिकाणी पार्क केलेल्या दिसतात. पण वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही हे न समजणारे कोडे आहे.विशेष म्हणजे ‘भारत सरकार’ किंवा ‘महाराष्ट्र शासन सेवार्थ’ असे नमुद असलेल्या काही सरकारी सेवेतील गाड्याही अशा पद्धतीने बिनधास्तपणे रस्त्यावरच पार्क केलेल्या असतात. कधी त्यातून ‘साहेब’ खरेदीसाठी उतरतात तर अनेकदा साहेबांचे कुटुंबिय खरेदीसाठी येत असतात. या सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांना कसे चलान करायचे असा प्रश्न वाहतूक नियंत्रक कर्मचाऱ्यांना पडत असल्यामुळेच तर ते सर्वच गाड्यांना कुठेही पार्क करण्याची मुभा देत नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. गोंदियातील कार पार्किंगचा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगर पालिकेकडून पार्र्किंग प्लाझाची निर्मिती केली जाणार आहे. मात्र तो तयार होण्यास किती काळ लागेल याची शाश्वती नाही. (जिल्हा प्रतिनिधी)