वाहतूक नियंत्रण विभागाचीच कोंडी

By Admin | Updated: December 9, 2014 22:52 IST2014-12-09T22:52:01+5:302014-12-09T22:52:01+5:30

दिवसागणित वाढत असलेली लोकसंख्या आणि त्यासोबत वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत आहेत. अशात गोंदिया शहरात निर्माण होत असलेली वाहतुकीची कोंडी फोडण्याची

Traffic Control Department | वाहतूक नियंत्रण विभागाचीच कोंडी

वाहतूक नियंत्रण विभागाचीच कोंडी

शाखा तणावग्रस्त : आवश्यकता ६८ ची, सध्या कार्यरत ३४ कर्मचारी
मनोज ताजने - गोंदिया
दिवसागणित वाढत असलेली लोकसंख्या आणि त्यासोबत वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत आहेत. अशात गोंदिया शहरात निर्माण होत असलेली वाहतुकीची कोंडी फोडण्याची जबाबदारी ज्या वाहतूक नियंत्रण विभागावर आहे त्या विभागाचीच सध्या कोंडी झाली आहे. ११ वर्षापूर्वीच्या लोकसंख्येनुसार आणि वाहनसंख्येनुसार मंजूर असलेल्या मनुष्यबळावर आजही या शाखेचा कारभार सुरू असल्यामुळे ही शाखा सध्या तणावग्रस्त झाली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या साडेतेरा लाख लोकसंख्येसाठी १६ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. मात्र एवढ्या लोकसंख्येसाठी जिल्ह्यात असलेल्या अधिक दुचाकी, तीन चाकी, चार चाकी मिळून ३ लाखांहून अधिक वाहनांच्या नियंत्रणासाठी वाहतूक नियंत्रण शाखा केवळ एकच आहे. विशेष म्हणजे या शाखेकडे असलेले मनुष्यबळ आताच्या वाहनसंख्येच्या तुलनेत खूपच तोकडे पडत आहे.
२००३ मध्ये गोंदियात वाहतूक नियंत्रण शाखेची निर्मिती करण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या आणि वाहनसंख्या पाहून निर्धारित केलेले मनुष्यबळ अजूनही बदलविण्यात आलेले नाही. मनुष्यबळाची संख्या वाढविण्यासाठी २०१२ मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेला नाही. त्यामुळे वाहतूक नियंत्रण कठीण झाले आहे.

Web Title: Traffic Control Department