रेती वाहून नेणारे तीन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:21+5:30

ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी २९३१ तसेच ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी २३०९ ला तेढवा येथील मुकेश गोवर्धन मात्रे (२१) हा चालवित होता. एक ब्रास रेती वाहून नेत असताना पथकाने त्याला पकडले. दुसऱ्या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-टीसी ००२९ व विना क्रमांकाच्या ट्रॉलीत एक ब्रास रेती टाकून वाहतूक करीत असताना तेढवा येथील संतोष तिलकचंद सोनवाने (४०) याला पथकाने पकडले.

Three tractors carrying sand were caught | रेती वाहून नेणारे तीन ट्रॅक्टर पकडले

रेती वाहून नेणारे तीन ट्रॅक्टर पकडले

Next
ठळक मुद्देमाकडी परिसरातील कारवाई : २१ लाखांचा माल केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या माकडी परिसरातील कालव्याजवळ पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रेती वाहून नेणारे तीन ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.४) सकाळी ५.३० वाजतादरम्यान पथकाने नाकाबंदी लावून केली.
ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी २९३१ तसेच ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी २३०९ ला तेढवा येथील मुकेश गोवर्धन मात्रे (२१) हा चालवित होता. एक ब्रास रेती वाहून नेत असताना पथकाने त्याला पकडले. दुसऱ्या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-टीसी ००२९ व विना क्रमांकाच्या ट्रॉलीत एक ब्रास रेती टाकून वाहतूक करीत असताना तेढवा येथील संतोष तिलकचंद सोनवाने (४०) याला पथकाने पकडले. तर तिसऱ्या कारवाईत तेढवा लक्ष्मीचंद मात्रे (२८) ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-जी ६५७३ व ट्रॉली क्रमांक एमएच ३५- ६७३५ मध्ये एक ब्रास रेती टाकून वाहतूक करीत असताना पथकाने त्याला पकडले. लिज नसताना रेतीची वाहतूक केली जात होती. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २१ लाख १२ हजार सांगीतली जाते.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर, सहायक फौजदार गोपाल कापगते, पोलीस हवालदार मधुकर कृपाण, नरेंद्र फुलबांधे, रत्नशील मेश्राम, कैलाश ठाकरे, नंदकिशोर ठाकरे व ओंकार गौतम यांनी केली. सदर घटनेसंदर्भात रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three tractors carrying sand were caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू