Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला

बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला

Vaishali Rameshbabu : भारताच्या वैशाली रमेशबाबू हिने २०२६ ची FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:42 IST2026-04-16T13:40:22+5:302026-04-16T13:42:03+5:30

Vaishali Rameshbabu : भारताच्या वैशाली रमेशबाबू हिने २०२६ ची FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.

Vaishali Rameshbabu wins the 2026 fide womens candidates viswanathan anand feeling proud | बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला

बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला

भारताच्या वैशाली रमेशबाबू हिने २०२६ ची FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. या विजयासोबतच वैशालीने या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या 'वर्ल्ड चॅम्पियनशिप'मधील आपलं स्थान पक्के केलं आहे. तिथे तिचा सामना पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या जू वेनजुन हिच्याशी होईल.

वैशालीने अटीतटीच्या लढतीत बिबिसारा अस्सौबायेवा हिचा अर्ध्या गुणाच्या फरकाने पराभव करून हे जेतेपद पटकावलं. तिने एकूण ८.५ गुण मिळवले. वैशालीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल 'फिडे'ने (FIDE) तिचं अभिनंदन केलं आहेच, पण त्यासोबतच भारताच्या प्रत्येक ग्रँडमास्टरचे आदर्श मानले जाणारे माजी वर्ल्ड चँपियन विश्वनाथन आनंद यांनीही तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

विश्वनाथन आनंद यांनी वैशालीच्या यशाला सलाम केला आणि म्हटलं की, "मला तिचा अभिमान आहे. तिच्या या यशस्वी प्रवासाचा भाग होता आलं आणि तिला पाठबळ देण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे."

सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात

वैशाली रमेशबाबूचा जन्म २१ जून २००१ रोजी चेन्नई येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच तिने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती. अल्पावधीतच तिने अंडर-१२ आणि अंडर-१४ गटात आपलं वर्चस्व निर्माण केलं. तिने या दोन्ही गटांत 'युथ चेस चॅम्पियनशिप' जिंकली. २०२१ मध्ये ती 'इंटरनॅशनल मास्टर' बनली. २०२३ मध्ये कतार मास्टर्स आणि लोब्रेगाट ओपनमधील दमदार कामगिरीनंतर तिने ग्रँडमास्टर होण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या.

इतिहासातील पहिली बहीण-भावाची जोडी

बुद्धिबळाच्या पटावर वैशालीची ओळख ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदची मोठी बहीण म्हणूनही आहे. २०२४ मध्ये या बहीण-भावाच्या जोडीकडे एकाच वेळी 'ग्रँडमास्टर' ही पदवी होती. इतिहासात अशी कामगिरी करणारी ही जगातील पहिलीच बहीण-भावाची जोडी ठरली आहे.

Web Title : वैशाली रमेशबाबू ने रचा इतिहास, FIDE कैंडिडेट्स टूर्नामेंट जीता

Web Summary : वैशाली रमेशबाबू FIDE कैंडिडेट्स टूर्नामेंट जीतने वाली पहली भारतीय महिला बनीं, जिससे उन्होंने विश्व चैम्पियनशिप में जगह बनाई। उन्होंने बिबिसारा अस्सौबायेवा को हराया। विश्वनाथन आनंद ने उनकी उपलब्धि की सराहना की। वैशाली ने छह साल की उम्र में शतरंज खेलना शुरू किया और अपने भाई प्रज्ञानानंद के साथ ग्रैंडमास्टर का खिताब हासिल किया।

Web Title : Vaishali Rameshbabu Makes History, Wins FIDE Candidates Tournament

Web Summary : Vaishali Rameshbabu became the first Indian woman to win the FIDE Candidates Tournament, securing a spot in the World Championship. She defeated Bibisara Assaubayeva by a narrow margin. Viswanathan Anand praised her achievement. Vaishali started playing chess at six and achieved the Grandmaster title along with her brother Praggnanandhaa.