सलमान खानचा 'मातृभूमी' थेट OTT वर येणार? प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:41 IST2026-04-16T13:40:53+5:302026-04-16T13:41:28+5:30

सलमान खान सध्या त्याच्या 'मातृभूमी' या आगामी चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे.

Salman Khan Maatrubhumi Movie Will Not Be Released Directly On Ott It Will Release In Theatres Only | सलमान खानचा 'मातृभूमी' थेट OTT वर येणार? प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट आली समोर

सलमान खानचा 'मातृभूमी' थेट OTT वर येणार? प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट आली समोर

बॉलिवूडचा 'सुलतान' सलमान खान सध्या त्याच्या 'मातृभूमी' या आगामी चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, हा चित्रपट चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

'बॉलिवूड हंगामा'नुसार, 'मातृभूमी' थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा कोणताही विचार नाही. हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित केला जाणार आहे. सलमान खान आजही मोठा सुपरस्टार आहे आणि 'मातृभूमी' हा मोठ्या स्केलवर बनवलेला चित्रपट आहे. त्यामुळे सलमान आणि दिग्दर्शक अपूर्व लाखिया दोघेही हा चित्रपट थिएटरमध्येच रिलीज करण्याच्या बाजूने आहेत.

चित्रपटातून चीनशी संबंधित काही घटक काढून टाकण्यावर काम सुरू आहे. अशा स्थितीत काहींना असे वाटले की ओटीटीवर सेन्सॉरशिप नसते, म्हणून चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल. मात्र, आता जे चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होतात, त्यांनाही चित्रपटगृहातील चित्रपटांप्रमाणेच सरकारी प्रमाणीकरण प्रक्रियेतून जावे लागते. त्यामुळे ओटीटीवर गेल्यानंतरही सेन्सॉरपासून सुटका होईल, हा समज चुकीचा आहे. त्यामुळे 'मातृभूमी' हा चित्रपट OTT ऐवजी सिनेमागृहातच प्रदर्शित होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या चित्रपटात सलमान खानसह अभिनेत्री चित्रांगदा सिंह सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title : सलमान खान की 'मातृभूमि' ओटीटी पर नहीं, सिनेमाघरों में होगी रिलीज़

Web Summary : सलमान खान की 'मातृभूमि' सिनेमाघरों में रिलीज़ होगी, ओटीटी की अफवाहें खारिज हुईं। निर्माताओं का लक्ष्य बड़े पर्दे पर रिलीज़ करना है, संभवतः अगस्त 2026 में। फिल्म को सभी प्लेटफॉर्मों के लिए सेंसर प्रमाणन की आवश्यकता है।

Web Title : Salman Khan's 'Matrubhoomi' to Release in Theaters, Not on OTT

Web Summary : Salman Khan's 'Matrubhoomi' will release in theaters, dismissing OTT rumors. Producers aim for a big screen release, possibly in August 2026. The film requires censor certification for all platforms.