"अक्षय खन्ना नाही तू पाहिजे होतास रहमान डकैत"; शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० वर्षीय खलनायकासमोर प्रकट केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:42 IST2026-04-16T13:40:43+5:302026-04-16T13:42:26+5:30

'धुरंधर'च्या पहिल्या भागातील रहमान डकैतची भूमिका चांगलीच गाजली. अक्षय खन्नाने ही भूमिका साकारली. आता 'धुरंधर' पाहून बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक इच्छा व्यक्त केली.

Shatrughan Sinha expressed his desire to gulshan grover played villain rehman dakait akshaye khanna | "अक्षय खन्ना नाही तू पाहिजे होतास रहमान डकैत"; शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० वर्षीय खलनायकासमोर प्रकट केली इच्छा

"अक्षय खन्ना नाही तू पाहिजे होतास रहमान डकैत"; शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० वर्षीय खलनायकासमोर प्रकट केली इच्छा

'धुरंधर'च्या पहिल्या भागातील रहमान डकैतची भूमिका चांगलीच गाजली. अक्षय खन्नाने ही भूमिका साकारली. या भूमिकेचं खूप कौतुक झालं. इतकंच नव्हे तर दुसऱ्या भागात अक्षय खन्नाला चाहत्यांनी मिस केलं. आता 'धुरंधर' पाहून बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक इच्छा व्यक्त केली. 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्ना नाही तर ७० वर्षीय खलनायक गुलशन ग्रोव्हरने रहमान डकैत साकारला पाहिजे होता, असं ते म्हणाले. जाणून घ्या सविस्तर

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गुलशन ग्रोव्हर यांनी सविस्तर सांगितलं. ते म्हणाले- ''दोन दिवसापूर्वी शुत्रुघ्न सिन्हा, राकेश रोशन आणि शशी रंजन यांच्यासोबत मी जेवायला गेलो होतो. मी थोडा उशीरा पोहोचलो. तेव्हा शत्रुघ्न मला बघून म्हणाले- गुलशन धुरंधर असा सिनेमा आहे ज्यात तू पाहिजे होतास. जर मी अक्षय खन्नाची भूमिका साकारली असती तर किती मजा आली असती. माझी सुद्धा या गोष्टीला सहमती होती. आणि लोकांनाही मला तसं पाहणं आवडलं असतं.'' 

अशाप्रकारे या दिग्गज कलाकारांमध्ये संभाषण झालं. एकूणच 'धुरंधर' सिनेमाची ज्येष्ठ कलाकारांमध्येही चर्चा असून त्यांनाही सिनेमा आवडलेला दिसतोय. 'धुरंधर' बद्दल सांगायचं झालं तर सिनेमाचा पहिला भाग डिसेंबर २०२५ मध्ये आला होता. तर सिनेमाचा दुसरा भाग मार्च २०२६ मध्ये आला. दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही सिनेमांनी मिळून तब्बल ३००० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा २०२६ चा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

Web Title: Shatrughan Sinha expressed his desire to gulshan grover played villain rehman dakait akshaye khanna