शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश तर सोडाच कापडाचाच पत्ता नाही

By कपिल केकत | Updated: July 15, 2024 18:24 IST

शाळा सुरू होऊन पंधरवडा लोटला : विद्यार्थी गणवेशविनाच शाळेत

कपिल केकतगोंदिया : ‘समग्र शिक्षा’अंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन जोड दिले जाणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात गणवेश द्या, असे शासनाकडून बोलले जाते. मात्र, आता शाळा होऊन पंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलेले नाहीत. कारण, गणवेश तर सोडाच आतापर्यंत कापडाचा पत्ता नाही. अशात महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेश कधी शिवले जाणार व कधी वाटप होणार, हा एक प्रश्नच आहे.

एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने शासनाने शिक्षणाचा अधिकार अंमलात आणला. यातूनच स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर शिक्षणाचा आर्थिक बोजा येऊ नये, यासाठी शासनाकडूनच गणवेश व पुस्तकांचे वाटप केले जाते. यंदाही विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश वाटप केले जाणार होते. यातील एक जोड गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांकडून शिऊन वाटप करावयाचा होता. या गणवेशासाठी लागणारे कापड वितरित करण्यासाठी शासनाकडून कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्याला कापड प्राप्त झालेले नाही.

यामुळे आता शाळा सुरू होऊन पंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. विशेष म्हणजे, गणवेशासाठी कापड कटिंग पाठविले जाणार होते व बचत गटांना ते शिऊन गणवेश तयार करून द्यायचे आहेत. मात्र, कापडाचाच पत्ता नसल्याने कापड येणार कधी व गणवेश शिऊन मिळणार कधी, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांनाच नव्हे तर यंत्रणेलाही पडला आहे.

बालभारतीचे काम तंतोतंत

- विद्यार्थ्यांना गणवेश सोबतच पाठ्यपुस्तकांचेही वाटप केले जात असून, बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा केला जातो. यामध्ये जिल्ह्याकडून मागविल्यानुसार बालभारतीने पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करून दिला. त्या पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी वाटप करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांवरच भागवून घ्यावे लागत आहे. 

माविमला शिवायचे आहेत ७६,७९१ गणवेश- महिला आर्थिक विकास महामंडळ महिला बचत गटांच्या माध्यमातून गणवेश शिऊन घेणार असून, त्यांना ७६,७९१ गणवेश तयार करून द्यायचे आहेत. यासाठी माविमने नियोजन केले असून, त्यांची तयारी आहे. मात्र कापडच नसल्याने ते सुद्धा वाट बघत आहेत. नुकतेच भंडारा जिल्ह्याला कापड मिळाल्याची माहिती आहे. यामुळे काही दिवसांत गोंदियालाही कापड मिळणार अशी शक्यता आहे.

अशी आहे तालुकानिहाय विद्यार्थी संख्या

तालुका - विद्यार्थी संख्यासडक-अर्जुनी- ७६७१

देवरी-६७२१सालेकसा- ६७३७

आमगाव- ८२१५गोरेगाव- ८१५६

तिरोडा- ११६२१गोंदिया- १९,२८८

अर्जुनी-मोरगाव- ८३८२

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाgondiya-acगोंदिया