शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी विमानतळाकडे सरकारने फिरविली पाठ

By admin | Updated: October 16, 2015 02:39 IST

राज्य सरकारने विदर्भातील काही शहरांमधील विमानतळांचा विकास करण्याची आणि तेथे नागरी विमान वाहतुकीच्या दृष्टीने तयारी करण्याची घोषणा केली.

सर्व सुविधा उपलब्ध : भेदभावपूर्ण निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये असंतोषगोंदिया : राज्य सरकारने विदर्भातील काही शहरांमधील विमानतळांचा विकास करण्याची आणि तेथे नागरी विमान वाहतुकीच्या दृष्टीने तयारी करण्याची घोषणा केली. मात्र सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असणाऱ्या गोंदिया येथील बिरसी विमानतळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे गोंदियावासीयांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात गोंदियावासीयांच्या सुविधेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. सरकारचे हे पाऊल भेदभावपूर्ण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार ३५० कोटी रुपये खर्च करून यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला येथील विमानतळांचा विकास करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तेथून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यात चंद्रपूर-अमरावती-पुणे-मुंबई, दुसरी सेवा चंद्रपूर-अकोला-अमरावती-मुंबई आणि तिसरी विमानसेवा चंद्रपूर-यवतमाळ-अमरावती-पुणे-मुंबई या तीन मार्गांवर करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र त्यात गोंदियाला वगळण्यात आले. वास्तविक राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्याला राज्याच्या राजधानीसह इतर ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा गरजेची झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे. सोमवारी आणि बुधवारी मुंबईतील कॅनिबनेट मीटिंगनिमित्त अनेक लोक मुंबईच्या दिशेने धाव घेतात. त्यामुळे या दोन दिवसाकरिता गोंदियातून मुंबईकरिता विमानसेवा देण्याची मागणी होत आहे. तसेच लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधूनही हवाई यात्री गोंदियात येऊ-जाऊ शकतात.बिरसी विमानतळ हे मध्यप्रदेशातील कान्हा किसली या वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सर्वात जवळचे विमानतळ ठरणार आहे. प्रिंस चार्ल्स, स्व.धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपतींचे विमान येथील विमानतळावर आतापर्यंत उतरले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)