TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:31 IST2025-11-25T17:29:00+5:302025-11-25T17:31:04+5:30

Gondia : महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

TET Paper Leak: Calls to teachers in Gondia from Marathwada, one asked for Rs 1.5 lakh, another asked for Rs 3 lakh | TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये

TET Paper Leak: Calls to teachers in Gondia from Marathwada, one asked for Rs 1.5 lakh, another asked for Rs 3 lakh

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. टीईटी पेपरच्या आदल्या दिवशी जिल्ह्यात शंभरावर परीक्षार्थी शिक्षकांना पेपरसाठी मराठवाड्यातून कॉल आले. पेपरकरिता दीड लाख रुपयांपासून तीन लाखांपर्यंत मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) करिता रविवारी राज्यात परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील शंभरावर शिक्षकांना परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मराठवाड्यातून कॉल आले.

आणखी १० जणांवर गुन्हा

कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी आणखी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.. त्यामध्ये रोहित पांडुरंग सावंत (वय ३५, रा. कासारपुतळे, जि. कोल्हापूर), अभिजीत विष्णू पाटील (४०, रा. बोरवडे, , जि. कोल्हापूर), संदीप भगवान गायकवाड (४६, रा. बेलवाडी, जि. सातारा), अमोल पांडुरंग जरग (३८, रा. सरवडे,, जि. कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार (३५, रा. कासारपुतळे, जि. कोल्हापूर), रणधीर तुकाराम शेवाळे (४६, रा. सैदापूर,), तेजस दीपक मुळीक (२२, रा. निमसोड, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (३२, रा. खोजेवाडी, जि. सातारा), संदीप शिवाजी चव्हाण (४०, रा. कोपार्डे हवेली, जि. सातारा) आणि श्रीकांत नथुराम चव्हाण (४३, रा. उंब्रज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

कोणताही गैरप्रकार नाही

पुणेः काही ठिकाणी परीक्षेत अनुचित प्रकार घडल्याचे समोर आल्याने परीक्षा रद्द तर होणार नाही ना, अशी चिंता परीक्षार्थीना वाटत होती. याबाबत राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचा दावा करून परीक्षार्थीनी चिंता करू नये, असेही आश्वासित केले.

चौकशी समिती स्थापन

नाशिक जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांसाठी मराठी पेपर दिल्याच्या प्रकरणाची राज्य परीक्षा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. सीडीओ मेरी शाळेतील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याचे माध्यमातून समोर आले. सुमारे ४५० विद्यार्थ्यांना इंग्रजीऐवजी मराठीची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची नोंद आहे.

Web Title : टीईटी पेपर लीक: गोंदिया के शिक्षकों को कॉल, लाखों की मांग

Web Summary : टीईटी परीक्षा से पहले, कोल्हापुर में पेपर लीक रैकेट का भंडाफोड़ हुआ। गोंदिया के शिक्षकों को मराठवाड़ा से कॉल आए, जिसमें पेपर के लिए ₹1.5-3 लाख की मांग की गई। पुलिस ने दस और लोगों पर आरोप लगाए। अधिकारियों का दावा है कि परीक्षा में कोई गड़बड़ी नहीं हुई।

Web Title : TET Paper Leak: Calls to Gondia Teachers, Lakhs Demanded

Web Summary : Before the TET exam, a paper leak racket was exposed in Kolhapur. Gondia teachers received calls from Marathwada demanding ₹1.5-3 lakhs for the paper. Police filed charges against ten more individuals. Officials claim no malpractice occurred in the exam.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.