शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आदेशाची तहसील कार्यालयात अवहेलना

By admin | Updated: September 25, 2014 23:25 IST

राज्य सरकारच्या वतीने जनतेच्या हितासाठी वेळोवेळी लोकोपयोगी आदेश निर्गमित केले जातात. मुंबईवरुन निघालेल्या लोकहितार्थ आदेशाची कितपत अंमलबजावणी होते यावर ‘त्या’ पदहुकुमाचे

मुद्रांक शुल्क माफ : राज्याच्या अवर सचिवाची सूचनाअमरचंद ठवरे - बोंडगावदेवीराज्य सरकारच्या वतीने जनतेच्या हितासाठी वेळोवेळी लोकोपयोगी आदेश निर्गमित केले जातात. मुंबईवरुन निघालेल्या लोकहितार्थ आदेशाची कितपत अंमलबजावणी होते यावर ‘त्या’ पदहुकुमाचे यशापयश अवलंबून असते. शासन स्तरावरुन निघालेल्या आदेशाची मात्र तहसील कार्यालयात अवहेलना होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मुद्रांक शुल्क माफ असतानासुद्धा तहसील कार्यालय तसेच न्यायालयात मात्र मुद्रांक शुल्क लावल्याशिवाय अर्ज पुढे जातच नाही.मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे अव्वर सचिव भा.सु. तायडे यांनी १९ आॅगस्ट २०१४ रोजी जाहीर सूचना पत्रक काढून तहसील कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. शासनाचे अव्वर सचिव यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जनतेला सूचित करण्यात आले की, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रास मुद्रांक शुल्क माफ आहे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. सदर अधिनियमाच्या अनुसूची एक मधील अनुच्छेद चार अन्वये आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करीत आहे. असे आदेशान्वये महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे अव्वर सचिव भा.सु. तायडे यांनी सूचना पत्रकात म्हटले आहे. त्यांच्या नावाने असलेले ‘सूचना’ पत्र तहसील कार्यालयाच्या भिंतीवर चिपकवले आहेत. असे असतानासुद्धा आजही तालुक्यातील समस्त जनतेला तहसील कार्यालयात अर्ज करताना मुद्रांक शुल्क लावणे बंधनकारक केले जात असल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या लोकहितार्थ आदेशाची माहिती व्हावी या हेतूने राज्याच्या अव्वर सचिवामार्फत काढलेल्या सूचना पत्राकडे संबंधित अधिकारी डोळेझाक करुन सामान्य जनतेच्या माथी आर्थिक भुर्दंड लादत असल्याचे चित्र आजही शासकीय कार्यलयात दिसून येत आहे. जात, उत्पन्न, वास्तव्य, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्जावर तसेच हलपनाम्यावर मुद्रांक शुल्क लावल्याशिवाय संबंधित अधिकारी अर्जच स्वीकारत नाही, अशी परिस्थिती आजतरी दिसून येत आहे. शासन एकीकडे मुद्रांक शुल्क माफ करण्याचे सूचना पत्र लावतो. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयाचे संबंधित अधिकारी सामान्य जनतेला मुद्रांक शुल्क न लावता अर्ज करा, असे सांगत नाही. ऊलट मुद्रांक शुल्क लावलेलेच अर्ज स्वीकारतात, अशी सामन्य जनतेची ओरड आहे. एकंदरीत राज्याच्या अव्वर सचिवाच्या सूचना पत्राला संबंधित अधिकारी मात्र केराची टोपली दाखवित असल्याचे स्पष्ट दिसत आहे.