पाठिंबा देण्यासाठी सरसावल्या शिक्षक संघटना

By Admin | Updated: March 29, 2016 03:07 IST2016-03-29T03:07:25+5:302016-03-29T03:07:25+5:30

गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि राज्याच्या विविध भागात सेवा देत

Teachers Association to support | पाठिंबा देण्यासाठी सरसावल्या शिक्षक संघटना

पाठिंबा देण्यासाठी सरसावल्या शिक्षक संघटना

गोंदिया : गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि राज्याच्या विविध भागात सेवा देत असलेल्या मूळच्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांनी अखेर सोमवारपासून उपोषण सुरू केले. जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेर सहकुटुंब सुरू केलेल्या या साखळी उपोषणाला पहिल्याच दिवशी अनेक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला. एवढेच नाही तर पालकमंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
पती एकीकडे तर पत्नी राज्याच्या दुसऱ्या टोकावर, कोणी आईवडिल व इतर नातेवाईकांपासून कोसो दूर, अशा परिस्थितीत अनेक वर्षांपासून सेवा देत असणारे हे शिक्षक स्वगृही गोदिया जिल्ह्यात बदली होण्यासाठी आस लावून बसले आहेत. परंतू बदलीच्या प्रतीक्षेत संसाराचा गाडा हाकणे त्यांना कठीण होत असल्यामुळे अनेकांचा संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.
आपल्या या व्यथा समजून घेऊन गोंदिया जिल्हा परिषदेने आपला हेकेखोरपणा सोडून द्यावा आणि आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा करावा यासाठी बदलीचा प्रस्ताव दिलेल्या २२० शिक्षक-शिक्षिकांनी सहकुटुंबच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी त्यांनी उपोषण सुरू केले. (जिल्हा प्रतिनिधी)

अनेक पदाधिकाऱ्यांची मंडपाला भेट
४गृहजिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या या शिक्षकांच्या साखळी उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी उपोषण मंडपात जाऊन शिक्षकांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही दिली. यावेळी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यासुद्धा उपस्थित होते.
४दिवसभरात या मंडपाला जि.प.च्या माजी सभापती सविता संजय पुराम, काँग्रेसचे युवा नेता विशाल गोपालदास अग्रवाल, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, रजनी गौतम, प्रिती रामटेके, विश्वजित डोंगरे, विजय लोणारे आदी पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्यांची बाजू उचलण्याचे आश्वासन दिले.

या संघटनांनी
दिला पाठिंबा
४विशेष म्हणजे आतापर्यंत या मुद्यावर फारशा गंभीर नसणाऱ्या अनेक शिक्षक संघटनांनीही आता शिक्षक आंतरजिल्हा बदली कृती समितीच्या या भूमिकेला पाठींबा दर्शविण्यासाठी त्यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. त्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद गोंदिया, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक पुरोगामी संघटना गोंदिया आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मागणीला पाठिंबा दर्शविला.

Web Title: Teachers Association to support