शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकणार

By admin | Updated: December 27, 2014 22:53 IST

जवळील जि.प. उच्च प्राथमिक शाळा भजेपार येथे आरटीईनुसार आठवा वर्ग जोडण्यात आला. वर्ष संपत आले तरी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात न आल्याने शाळेला १ जानेवारीपासून कुलूप

वडेगाव : जवळील जि.प. उच्च प्राथमिक शाळा भजेपार येथे आरटीईनुसार आठवा वर्ग जोडण्यात आला. वर्ष संपत आले तरी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात न आल्याने शाळेला १ जानेवारीपासून कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी भजेपार यांनी दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार पंचायत समिती तिरोडा, केंद्र बडेगाव अंतर्गत येणाऱ्या भजेपार शाळेला आरटीर्ठ नियमानुसार जून २०१४ पासून आठवा वर्ग जोडण्यात आलेला आहे. शाळेत २५२ विद्यार्थी संस्था व सात शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे शाळेतील एक वर्ग सतत वाऱ्यावर असतो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम पडत आहे. शिवाय शसनाचे उपक्रम, क्रीडा स्पर्धा, मतदार यादी प्रशिक्षण व इतर तत्सम कामांचा पिंजाणा सतत सुरुच असतो.
अशा परिस्थितीत व आरटीई निकषानुसार दोन शिक्षकांची नितांत गरज आहे. मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी-पदाधिकारीच एकमेकाकडे बोट दाखवून जबाबदारी टाळत आहेत.
विशेष म्हणजे भजेपार हे गाव जि.प. शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष मदन पटले, यांच्या जि.प. क्षेत्रातील आहे. एवढेच नव्हे तर पं.स.चे माजी उपसभापती धानसिंग बघेले यांचे गाव असूनही शाळेप्रती त्यांच्या उदासिनतेमुळे गावकरी संतप्त आहेत. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी निराशाने होत टेकले असून अधिकारीही गावकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.
त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत शिक्षक नियुक्ती करा अन्यथा १ जानेवारी पासून शाळेला कुलूप ठोकण्याचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने घेतला असून त्यांची जाणीव वरिष्ठ अधिकारी पदाधिकाऱ्यांना करुन देण्यात आली आहे. (वार्ताहर)