शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कनेरीत घेतली आढावा सभा

By admin | Updated: May 16, 2016 02:00 IST

कनेरी या गावाला आदर्श करण्याकरिता प्रत्येक बाबतीत तांत्रिकदृष्ट्या विचार करून व भविष्याचा वेध घेऊन काम करण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

२९५ शोषखड्डे तयार होणार : नागरिकांसाठी विविध उपक्रमगोंदिया : कनेरी या गावाला आदर्श करण्याकरिता प्रत्येक बाबतीत तांत्रिकदृष्ट्या विचार करून व भविष्याचा वेध घेऊन काम करण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शुक्रवारी कनेरी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित आढावा सभेत ते बोलत होते. गावात पिण्याचे शुध्द पाणी, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची अत्याधुनिक सुविधा, वाचनालय, अत्याधुनिक ग्रामपंचायत, महिला व पुरूषांचे स्वयंपूर्ण बचत गटातून आर्थिक विकास, कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीत गावकऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. याकरिता ग्रामपंचायत सहकार्य करीत आहे. यावेळी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती कविता रंगारी, सरपंच इंदू मेंढे, खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, उपसरपंच प्रेमराज मेंढे, पं.स. सदस्य राजेश कठाणे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत धमगाये, उपविभागीय अभियंता देशमुख, शाखा अभियंता अगळे, वसंत गहाणे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन भेंडारकर, चंद्रकुमार खोटेले, शिशुकला तवाडे, सरिता वैद्य, कोकिळा मेंढे, सचिव सी.जी. बागडे उपस्थित होते. आढावा घेताना त्यांनी, गावकऱ्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्या याकरिता ग्रामपंचायत इमारत सुसज्ज व्हावी या करीता नवीन इमारत बांधकामाचा व आवश्यक सर्व बाबींचा प्र्रस्ताव सादर करण्यासंदर्भात निर्देश दिले. यावेळी खंडविकास अधिकारी टेंभरे यांनी, गावात झालेल्या कार्याचा अहवाल सादर करीत गावात बेसलाईन सर्वेनुसार १०० टक्के शौचालय बांधकाम झाल्याचे सांगून, नांदेड पॅटर्ननुसार २९५ कुटुंबाला शोषखड्ड्यांची प्रशासकीय मान्यता मिळाली. ६५ शोषखड्डे तयार झाले असल्याची माहिती दिली. गावात ४२ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. १० लाखांचे सिमेंट रस्ता बांधकाम झाले आहे. २० लाखांचा बंधारा बांधकाम सुरू आहे. २० लाख खर्च करून मग्रारोहयो अंतर्गत गाव तलाव खोलीकरणाचे काम व नाला सरळीकरणाचे काम सुरू आहे. वाचनालयाची इमारत मंजूर झाली, ७१५ नागरिकांचे जनधन खाते असून विमा योजनेत सहभागी झाले आहेत. गावात आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात ५०३ नागरिकांची वेगवेगळी तपासणी करण्यात आली. महात्मे नेत्र पेढीकडून झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात ९२ लोकांची तपासणी करण्यात आली. ३२ लाभार्थी चष्म्यासाठी पात्र ठरले. समाधान शिबिरातून जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास दाखले देण्यात आले. रक्तदान तपासणी शिबिरात रक्त तपासणी करण्यात आली. शेतकऱ्यांना व्यावसायिक कृषीसंदर्भात मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी या उद्देशाने कृषी सहल आयोजित करण्यात आली. वनहक्काचे ७६ दावे तयार करून तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. शेणखतासाठी नाडेफ अंतर्गत १५ बांधकाम करण्यात आहे. महिला बचत गटांना सक्षमीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले. वांझ जनावरांकरिता आयोजित पशुचिकित्सा शिबिरात १२९ जनावरांची तपासणी करण्यात आली आली. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देत असल्याचे सांगितले. संचालन करून आभार सचिव बागडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)