शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

लघुउद्योगासाठी पुढाकार घ्या

By admin | Published: December 18, 2014 1:24 AM

सर्व मुलींनी आपल्या मोठ्या बहिणींना व जवळील इतर महिलांना लघुउद्योगाची माहिती द्यावी. त्यांनी प्रशिक्षणाबद्दलची माहिती देऊन स्वयंरोजगार करण्यासाठी तयार करावे, ....

गोंदिया : सर्व मुलींनी आपल्या मोठ्या बहिणींना व जवळील इतर महिलांना लघुउद्योगाची माहिती द्यावी. त्यांनी प्रशिक्षणाबद्दलची माहिती देऊन स्वयंरोजगार करण्यासाठी तयार करावे, असे आवाहन नगराध्यक्ष कशिश जयस्वाल यांनी केले. विद्यार्थिनींसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी न.प. व्दारा संचालित लघु उद्योगाबद्दल माहिती देऊन विद्यार्थिनींनी सर्वांगिन विकास साधण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी सुमंत मोरे होते. उद्घाटन नगराध्यक्ष जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून न.प.चे उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, एस.एस. गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस.यू. गर्ग, पर्यवेक्षक रु.बी. बिसेन, जी.एस. ठाकूर, एम.एस. फुंडे उपस्थित होते. सर्वप्रथम देवी सरस्वतीच्या फोटोला माल्यार्पण करून दीप प्रज्ज्वलित करण्यात आले. विद्यार्थिनींनी शारदा मातेची प्रार्थना व स्वागत गीत सादर केले. सर्वप्रथम मुख्याध्यापिका एस.यु. गर्ग यांनी अहवाल वाचन केले. त्यात शाळेच्या समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना माहिती करून दिली. न.प. उपाध्यक्ष रंगारी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात न.प. शाळांच्या सर्व समस्या व अडचणी सोडविण्याची हमी दिली. यावेळी सी.बी. शहारे यांच्या मार्गदर्शनात लेझीम नृत्य सादर करण्यात आले. सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतरांनी आपले सहकार्य दिले. संचालन व्ही.आर. चव्हाण तर आभार बिसेन यांनी मानले. यानंतर दुसऱ्या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण कार्यक्रम मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नुरजहा पठाण, मुख्याध्यापिका एस.यू. गर्ग, एन.बी. बिसेन व ठाकूर उपस्थित होते. यावेळी आलेल्या शारीरिक, बौध्दीक, सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थिनींना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पर्यवेक्षक बिसेन यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी एस.एल. वैद्य, एन.बी. मोटघरे, एन.एम. यादव, वाय.बी. तुमसरे, के.एस. राणे, एस.एस. लिल्हारे, एम.एस. फुंडे, एस.डी. तुरकर, व्ही.आर. चव्हाण, एम.एस. गाडेकर, एस.सी. सारंगापुरे, सी.बी. शहारे, पिंकी सुखवानी व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)