शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
3
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
4
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
5
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
6
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
7
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
8
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
9
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
12
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
13
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
14
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
15
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
16
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
17
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
18
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
19
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
20
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
Daily Top 2Weekly Top 5

सौंदड ग्रामीण रुग्णालय झाले पोरके

By admin | Updated: December 6, 2014 01:50 IST

कोणत्याही शासकीय रुग्णालयाशी सर्वसामान्य ग्रामीण नागरिक व गरीब रूग्ण यांचा रोजचाच येतो.

सुखदेव कोरे सौंदड (रेल्वे)
कोणत्याही शासकीय रुग्णालयाशी सर्वसामान्य ग्रामीण नागरिक व गरीब रूग्ण यांचा रोजचाच येतो. या बाबीला हेरून शासनाने प्रत्येक तालुक्यात तसेच जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्रामीण रुग्णालयांची स्थापना केली. मात्र सध्या सौंदड येथील ग्रामीण रूग्णालय डॉक्टरांविना पोरके झाल्याचे दिसून येत आहे.
सौंदड (रेल्वे) येथे तत्कालिन आ. सेवक वाघाये यांच्या प्रयत्नाने आॅगस्ट २००९ ला शासनाने ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली. परंतु सदर रुग्णालयाची वास्तव सुरूवात १५ आॅगस्ट २०१३ रोजी झाली. स्थानिक आ. राजकुमार बडोले यांच्या हस्ते सदर ग्रामीण रुग्णालयाचे थाटात उद्घाटन झाले. त्या दिवसापासून सदर ग्रामीण रुग्णालय नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले. डॉक्टरांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे तसेच कार्यालयीन वेळेत रुग्णालयात उपस्थित न राहणे, वेळेवर उपचार न करणे, रात्रपाळीत एकही डॉक्टर रुग्णालयात नसणे, असे अनेक प्रकार या रुग्णालयात होत आहेत. त्यामुळे रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक जि.प. सदस्य, पं.स. उपसभापती यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण गरीब जनता होरपळली जात असून मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक फटका बसत आहे. सदर ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या तत्काळ सोडविण्यात न आल्यास सौंदड ग्रामवासी सर्वदलीय मोर्च्याचे आयोजन करून आमरण उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
मागील आठ दिवसांपासून सौंदड ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नसून रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे. २८ नोव्हेंबरला सदर प्रतिनिधी, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सदाशिव विठ्ठले व सौंदड येथील विविध युवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली असता तेथे संपूर्ण बेबंदशाही दिसून आली. रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले. रुग्णालयात फक्त औषधी निर्माता व तंत्रज्ञ, चार परिचारिका, वाहन चालक, एक परिचर, डी.ई.ओ., एक शिपाई, सफाई कामगार यांच्याशिवाय इतर सर्व नियुक्त कर्मचारी अनुपस्थित होते. त्यावेळी २४ रुग्ण डॉक्टरांची वाट बघत ताटकळत बसले होते. या २४ रुग्णांपैकी निखील यावलकर, सुखराम टांगले, ग्रा.पं. सदस्य नंदकिशोर डोंगरवार यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे दिसून आले. इतर २१ रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत बेंचवर असल्याचे निदर्शनास आले. तसेच रुग्णालयाच्या ओपीडीसाठी एनआरएचएम चमूतील कंत्राटी डॉक्टर उपस्थित होते. एवढे मोठे ग्रामीण रुग्णालय एका कंत्राटी डॉक्टरच्या भरवश्यावर कसे काय चालविले जात आहे, हे कळायला मार्ग नाही.
ग्रामीण जनतेचा आता पक्का समज झाला आहे की, ग्रामीण रुग्णालयापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्र लाख मोलाचा होता. जोपर्यंत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होते, तेव्हा रुग्णांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नसे. त्यांचा वेळेवर उपचार होत असे, डॉक्टर व सर्व कर्मचारीसुद्धा उपस्थित राहत होते.
मात्र आता गैरसोय होवून रूग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत ग्रा.पं. चे सदस्य कैलास जांभूळकर यांनी स्थानिक आ. राजकुमार बडोले यांना भ्रमणध्वनीवरून रुग्णालयाच्या कारभाराविषयी अवगत केले, तेव्हा त्यांनी मी काय करू शकतो, तुम्ही आपल्या स्तरावर हे प्रकरण हाताळा, अशा शब्दात उत्तर दिले. स्थानिक जि.प. सदस्य व पं.स. सदस्य यांनीसुद्धा या समस्येकडे पाठ फिरवली आहे. यामुळे जनतेत लोकप्रतिनिधींविरूध्द असंतोष पसरलेला असून जनता खवळलेली आहे.
सदर रुग्णालयाच्या गैरसोयीकडे तातडीने लक्ष घालून डॉक्टरांची व इतर मूलभूत सोयींची व्यवस्था न केल्यास या रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील जनता व सर्वदलीय मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, असे स्थानिक जनतेने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.