शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सुकळीचा विशाल बनला उपजिल्हाधिकारी

By admin | Updated: April 11, 2015 01:45 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील

गावकऱ्यांची छाती फुगली : जिद्द आणि परिश्रमाने कमावले यशसंतोष बुकावन ल्ल अर्जुनी-मोरगावमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या निकालात तालुक्यातील सुकळी-खैरी येथील विशालकुमार शालीकराम मेश्राम याने बाजी मारून उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विदर्भातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत यश संपादन केले. त्यात गोंदिया जिल्ह्यातून विशालकुमार एकमेव आहे. परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तो २ मे पासून यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेणार आहे. ग्रामीण भागातील एका सर्वसाधारण कुटुंबातून हे यश संपादन करणाऱ्या विशालकुमारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघे ६८४ लोकसंख्या असलेले सुकळी हे गाव अर्जुनी मोरगावपासून ३ किमीवर आहे. या गावात उच्च पदस्थांची खाण आहे. विशालकुमारचे प्राथमिक शिक्षण सिरोंचा व जि.प. प्राथमिक शाळा सकुळी-खैरी येथे झाले आहे. पाचवा वर्ग पंचशिल विद्यालय बाराभाटी तर ६ ते १२ पर्यंतचे शिक्षण सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथून पूर्ण केले. त्यानंतर श्री गुरुगोविंदसिंग इन्स्टीट्यूट आॅफ इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली.या पदवीनंतर त्याला चेन्नई येथील कंपनीत नोकरीची संधी होती, मात्र त्यात लोकसेवा नव्हती, त्यामुळे त्याचे मन रमले नाही. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या मोठा भाऊ संतोषने हिंमत दिली आणि विशालने एमपीएससीचा मार्ग धरला. पुणे येथे जाऊन शिकवणी वर्गात शिक्षण घेतले. पहिल्या परीक्षेत अपयश आले. भावाने धीर दिला. त्यानंतर पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नात २०१३ मध्ये विक्रीकर अधिकारी व खंडविकास अधिकारी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या वरुड पंचायत समितीमध्ये परीविक्षाधिन खंडविकास अधिकारी पदावर कार्यरत असतानाच उपजिल्हाधिकारी पदासाठी दिलेल्या परीक्षेतही तो उत्तीर्ण झाला. विशालचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात वाहनचालक होते. ते ५ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. आई चौथा वर्ग शिकली असून गृहिणी आहे. एक भाऊ इंजिनिअर, दुसरा पोलीस उपनिरीक्षक आहे, तर बहिण अपेक्षा हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र तिची निवड झाली नाही. तिचे प्रयत्न त्या दिशेने सुरूच आहेत. यापुढे माझे आयएएस बनण्याचे स्वप्न असल्याचे विशाल मेश्राम यांनी सांगितले. अपयशातूनच यश गाठता येतजीवनात अपयश येतच असते. अपयशातून यशप्राप्ती होते. मात्र त्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम व संयमाची गरज असते. अपयशाने खचून न जाता वाटचाल सुरु ठेवल्यास तुम्हाला पुढे कुणीही थांबवू शकत नाही. कुणाची तरी प्रेरणा व आत्मविश्वास या बाबी महत्वपूर्ण आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करुन मार्गक्रमण करावे, असे विशालकुमार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला. ४ ग्रामीण भागात न्युनगंड असतो. परिक्षेविषयी अनामिक भीती असते. विद्यार्थ्यांत अमाप गुणवत्ता आहे. मात्र मार्गदर्शन व दिशानिर्देशांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय, उद्दिष्ट ठेवले पाहिजे. यामध्ये प्राप्तीसाठी निरंतर व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास निश्चितच यशप्राप्ती होते, असे विशालकुमार मेश्राम यांनी सांगितले.