शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादनाला फटका

By admin | Updated: April 12, 2015 01:32 IST

मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.

सालेकसा : मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. झाडावरील कोवळ्या कैऱ्याखाली पडून वाया गेल्या आहेत. त्यामुळे आंबा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचे व अमराई मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. साधारणत: आंब्याचे उत्पादनाचा विचार केला तर कोणत्या वर्षी पीक फार कमी असते तर कोणत्यावर्षी भरघोष उत्पादन मिळते असे सततचे अनुभव शेतकऱ्यांना होत असते. मागील वर्षी आंब्याचे उत्पादन फारच कमी होते. त्यामुळे गावरान आंब्याच्या स्वाद घेणाऱ्यांना सुध्दा बैगनपल्ली आंब्याचे काम चालवावे लागले. यंदा गावरान आंब्याच्या प्रत्येक झाडाला भरपूर बहर आला होता. काही दिवसापूर्वी आमवृक्षांना सुवासिक बहर असताना वादळी वाऱ्यासह पाऊस आला होता. त्यामुळे आमवृक्षांचा बहर मोहर खाली झडून पडला. भावी भरघोष उत्पादनावर फटका बसला. आता मागील दोन दिवसापूर्वी आलेला जोरदार वादळी वारा आणि पाऊस यामुळे झाडाला लागलेले कोवळे आंब्याचे फळ तुडून खाली पडले. छोटे छोटे कोवळे फळ असल्याने ते कोणाच्या उपयोगाचे नसतात. त्यामुळे खाली पडलेले सर्व कोवळे फळ माती पलीत झालेले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे उत्पादन यंदा निम्यावर आल्याचे दिसून येत आहे. आंब्याच्या नुकसानीच्यासुध्दा मोबदला शासनाने शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावरान आंबा कच्चा असो किंवा पिकलेला असो तो खाण्यासाठीच नाही तर विविध पेय, लोणच, चटणी, पने, आमटी, आमचूर, मुरब्बा असा असंख्य उपयोगात आणला जातो. (प्रतिनिधी)