शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूक गाड्यांचा स्थानकावर तासन्तास थांबा

By admin | Updated: November 24, 2015 02:18 IST

प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे तुमसर रोड रेल्वे स्थानकावर

तुमसर : प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे तुमसर रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक एकवर प्रवाशी रेल्वेगाड्याऐवजी मालवाहू गाड्या तासनतास उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे लहानमुले वयस्क मंडळींना कमालिचा शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. जंक्शन रेल्वे स्थानकाच्या सोयीसुविधा या रेल्वे स्थानकावर नाही, हे विशेष.तुमसर रोड रेल्वेस्थानक हे जंक्शन स्थानक आहे. नागपूर ते गोंदिया दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक असून रेल्वे प्रशासनाला सर्वाधिक महसूल येथून जाते. मेल व एक्सप्रेस गाड्यांचा येथे थांबा आहे. दररोज हजारो रेल्वे प्रवाशी येथून ये-जा करतात, पंरतु डाऊन मार्गावरील प्रवाशी रेल्वे गाड्या प्लँटफार्म क्रमांक एकवर न घेता प्लँटफार्म क्रमांक एकवर न घेता प्लॅटफार्म क्रमांक दोनवर तासनतास उभ्या राहतात. अप मार्गावरील गाड्या प्लटफार्म क्रमांक तीनवर उभ्या राहतात. या रेल्वे स्थानकावर दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी राहते. परंतु रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.लहान मुले, महिला, वृद्धांना पायऱ्या असलेल्या फूटब्रीजवरुन चढणे आणि उतरणे कमालिचे त्रासाचे ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकाच्या दर्जानुसार विना पायऱ्याचे फूटवे-ब्रीज तयार करण्याची गरज आहे. अपंग व वृद्धांकरिता चारचाकी वाहन या रेल्वे स्थानकावर दिसत नाही. रुळ ओलांडून हे वाहन जाणार सुध्दा नाही. मूलभुत सोयी सुविधा पुरविण्याची गरज येथे आहे. इलेक्टॉनिक डिसप्ले येथे काढून ठेवण्यात आले. त्याऐवजी पेंटीग केलेले बोर्ड येथे लावण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी ते बोर्ड दिसत नाही, यालाच आधुनिकीकरण म्हणायचे का? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)