तेली समाजाचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर

By Admin | Updated: June 16, 2014 23:35 IST2014-06-16T23:35:54+5:302014-06-16T23:35:54+5:30

महाराष्ट्रातील तेली समाजाच्या विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय चिंतन शिबिर गोंदिया येथे संताजी लॉन डॉ. मेघनाद साहानगर पिंडकेपार रोड येथे नुकतेच तेली समाज सेवक नाशिकचे

State-level think tank of Teli Samaj | तेली समाजाचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर

तेली समाजाचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर

सालेकसा : महाराष्ट्रातील तेली समाजाच्या विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय चिंतन शिबिर गोंदिया येथे संताजी लॉन डॉ. मेघनाद साहानगर पिंडकेपार रोड येथे नुकतेच तेली समाज सेवक नाशिकचे संपादक डॉ. वसंतराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
यावेळी प्रमुख उपस्थिती विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव कृपाण, किशोर आगाशे, उमाजी देशमुख, शिवशंकर हटवार, गजूनाना शेलार, प्राचार्य भुषण कर्डिले, सिनेट सदस्य प्रा. रमेश पिसे, ज्ञानेश्वर रायमल, शिवशंकर हटवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात श्रीसंत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी राजकीय परिवर्तनाच्या चळचळीत तेली समाजाचे स्थान, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रक्रियेत तेली समाजाचे युवक व महिलांचे स्थान, विविध सामाजिक संघटनेचे फेडरेशन तयार करणे या विषयावर डॉ. शरद महाले, प्रकाश भुरे, सुनीता काळे, यशवंत सायरे, प्रा. नामदेव हटवार, विठ्ठलराव गुुल्हाणे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी आपापल्या पध्दतीने सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित अतिथींनी आपल्या मनेगतातून व्यक्त केले.
विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा शाखा गोंदियाव्दारे आयोजित या चिंतन शिबीराला यशस्वी करण्यासाठी राजू वंजारी, श्रावण माहुरे, सरीता वंजारी, संतोष वैद्य, सेवकराम बावनकर, कमलेश बावनथडे, अलका कृपाण, विनोद जिभकाटे, मिलिंद समरीत, कैलाश भेलावे, प्रा. बाबुलाल करमकर, शंकर चामट, नारायण यावतकर, प्रकाश रुद्रकार यांनी सहकार्य केले.
के.एम. बावनकर, कैलाश आगाशे घेतले. अशोक खोब्रागडे ते उपस्थित पाहुणे तथा समाजाचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: State-level think tank of Teli Samaj