शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 7, 2014 23:38 IST

आर्द्रा नक्षत्रातही पावसाने पाठ फिरविल्याने सडक/अर्जुनी तालुक्यातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे. मृग नक्षत्रात दोन ते तीन वेळा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवानी

शेतकरी हतबल : दुबार पेरणीची पाळी, आवत्या पध्दतीचा वापर
राजेश मुनिश्वर - सडक/अर्जुनी
आर्द्रा नक्षत्रातही पावसाने पाठ फिरविल्याने सडक/अर्जुनी तालुक्यातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.
मृग नक्षत्रात दोन ते तीन वेळा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवानी पऱ्हे करण्याचा सपाटा सुरू केला होता. त्यात मिळेल त्या संकरीत व सुधारित धानाचे वाण वापरून पऱ्हे भरले. तालुक्यात १० हजार २०० हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सोय आहे. पण कोरडवाहू नऊ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रातील पऱ्हे धानाची वाट लागली आहे. बहुतेक ठिकाणचे पऱ्हे वाळायला लागले आहे. यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांना आता आवत्या पध्दतीचा वापर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. रोवणी पध्दतीने पूरक म्हणून दोन ते तीन बांध्या आता आवत्याच टाकावे लागेल, असे चित्र संपूर्ण तालुक्याला पहावयास मिळत आहे.
तालुक्यात २२ हजार ८६७ हेक्टर क्षेत्र या पिकाखाली येणारे क्षेत्र आहे. रेंगेपार, कोकणा/जमी., मोगरा, खडकी/ बाम्हणी, सौंदड, कोसमतोंडी, पांढरी, चिरचाडी, मालीजुंगा, शेंडा, पूतळी, डोंगरगाव/डेपो, देवपायली, चिखली, वडेगाव, घोटी, डुंडा, मुरपार, हेटी, बोपाबोडी आदी ठिकाणी पंपाच्या भरवश्यावर काही निवडक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे. पण पावसाच्या हुलकावणीमुळे रोवणी पुढे करावी की नाही, या विवंचनेत ते पडले असल्याची माहिती प्रगतीशील शेतकरी तुकाराम लंजे यांनी दिली आहे.
मागील वर्षी पावसाचे पाणी बऱ्यापैकी आल्यामुळे पाण्याची पातळी जमिनीत खोलवर गेली होती. त्यामुळे यावर्षी जून महिन्यात पंपाचे पाणी सिंचनासाठी कमी जास्त प्रमाणात पूरत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीच्या काळात पंपाचे पाईप १५० ते २०० फूट आत टाकल्यावरच पाणी पूरत असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. पण वीजेच्या लंपडावामुळे पऱ्ह्यासाठीसुध्दा पाणी देणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
येत्या चार दिवसात निसर्गाचे पाणी न आल्यास दुबार पेरणीची दाट शक्यता असल्याची माहिती कोकणा/जमी. चे प्रगतीशील शेतकरी खेमराज भेंडारकर यांनी दिली आहे. आता फक्त येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा म्हणण्याची वेळ राुहिली आहे.