‘त्या’ समाजशील शिक्षकाची अनाथ मुलांशी नाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:24+5:30

अनिल मेश्राम असे त्या समाजशिल शिक्षकाचे नाव आहे. ते सडक अर्जुनी येथील जि.प.शाळेत कार्यरत आहे. जिल्ह्यात अनाथाची माय म्हणून काम करणाऱ्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांच्या कार्याला समरस होऊन शिक्षक मेश्राम वेळोवेळी अनाथ मुलांना आवश्यक साहित्यासह, शालेय पुस्तकांचा पुरवठा करीत असतात.

'That' social teacher's ordeal with orphans | ‘त्या’ समाजशील शिक्षकाची अनाथ मुलांशी नाळ

‘त्या’ समाजशील शिक्षकाची अनाथ मुलांशी नाळ

Next
ठळक मुद्देखूप शिका, मोठे व्हा : जीवनोपयोगी वस्तु, रोख रक्कम भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जन्म देणारे माय-बाप असले तरी मुलांना सुसंस्कार देऊन त्यांचे भाग्य फळास नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एक शिक्षकच करतो. हल्लीच्या काळात प्रत्येकाला आपल्या कुटुंबीय संसाराशिवाय ईतरांच्या दु:खात सहभागी होण्याची उसंत मिळत नाही, असे सर्वत्र दिसत असले तरी आजही मुळातच भुतकाळातील आपले दैनंदिन जीवनाची आठवण करुन समाजातील वंचित, गरीब, पीडितांना आपला हातभार लावून त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचे काम एक समाजशील शिक्षक करीत आहे.
अनिल मेश्राम असे त्या समाजशिल शिक्षकाचे नाव आहे. ते सडक अर्जुनी येथील जि.प.शाळेत कार्यरत आहे. जिल्ह्यात अनाथाची माय म्हणून काम करणाऱ्या प्रा.डॉ. सविता बेदरकर यांच्या कार्याला समरस होऊन शिक्षक मेश्राम वेळोवेळी अनाथ मुलांना आवश्यक साहित्यासह, शालेय पुस्तकांचा पुरवठा करीत असतात. अलीकडेच सामाजिक दायित्व अंगिकारुन त्यांनी बोंडगावदेवी परिसरातील अनाथ मुलांसोबत अख्खा एक दिवस घालवून त्या अनाथ मुलांना पालकत्वाची जोड दिली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनाथ मुलांना सर्वोतोपरी मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असणारे सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी अनाथ मुलांच्या भेटीचा योग घडवून आणला. बाक्टी येथील अनाथ भावंड स्रेहा व विराज मेश्राम, बोंडगावदेवी येथील उमेश गोंधळे, अमित गोंधळे यांच्या घरी जाऊन त्या समाजशिल शिक्षकांनी भेट घेतली.त्या अनाथांच्या अडचणी जाणून घेतल्या.मोठ्या आस्थेनी विचारपूस केली. तेल, साखर, किराणा सामान व जिवनावश्यक वस्तु तसेच रोख रुपयांचा आर्थिक मदतीचा हात दिला.अनाथांच्या झोपडीवजा घरकुलात त्यांच्यासोबत वेळ घालविला. त्यांचेशी हितगुज साधून शिक्षण घ्या, खूप मेहनत घेऊन सुसंस्कारासह जीवनात यशस्वी व्हा. कोणतीही अडचण आल्यास नि:संकोच सांगा. मदतीला धावून येऊन परंतु परिस्थितीने खचू नका. सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी पालकत्वाची जबाबदारीची जाणीव त्यांनी करुन दिली. याप्रसंगी त्या अनाथ मुलांच्या चेहºयावरील आनंदाने समाधान व्यक्त केले. अनाथ मुलांच्या घरी येऊन त्यांच्याशी हितगुज साधल्याने तसेच त्यांच्या सोबतीने मन:स्वी समाधाने झाल्याने समाजशिल शिक्षक अनिल मेश्राम यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Web Title: 'That' social teacher's ordeal with orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.