कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:28+5:30

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीचे कार्य सुरू केले. तशी प्रशासनाकडून त्यांनी रितसर परवानगी घेतली. दरम्यान संपूर्ण देशात धारा १४४ लागू करण्यात आली.

Social activists fight for Corona ban | कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड

Next
ठळक मुद्देगृहभेटीच्या उपक्रमाला सुरूवात : हात धुन्याच्या तांत्रिक पद्धतीच्या प्रात्यक्षिकावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, कोव्हीड-१९ विषाणूपासून बचाव व्हावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेची माहिती देत हात धुन्याचे प्रात्यक्षिक देण्याचे कार्य वडेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा नर्सिंग कॉलेजच्या शिक्षिका भाग्यश्री केळवतकर करीत आहेत. यासाठी वडेगाव व परिसरातील गावात त्यानी गृहभेटीच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या भाग्यश्री केळवतकर या आरोग्य विभागाशी निगडीत आहेत. त्यादृष्टीने ग्रामीण भागात आरोग्य विषयक मार्गदर्शनाचे त्याचे कार्य अविरत सुरूच असते. कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखून शासनाने शाळांना सुटी दिली. तेव्हापासूनच त्यांनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीचे कार्य सुरू केले. तशी प्रशासनाकडून त्यांनी रितसर परवानगी घेतली. दरम्यान संपूर्ण देशात धारा १४४ लागू करण्यात आली. त्यामुळे गर्दी पसरू नये, यासाठी त्यानी ‘एकला चलो रे’ प्रमाणे घरोघरी जावून लोकांना हात धुन्याच्या तांत्रिक पद्धतीने मार्गदर्शन व कोरोना विषाणूबाबत, त्याच्या प्रतिबंधाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनेची माहिती देण्याचे कार्य सुरू केले. तसेच शिंकतांना व खोकतांना तोंडावर रूमाल घेतला पाहिजे.
बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यास हाताद्वारे अथवा एखाद्या वस्तुवर ड्रॉपलेट्स असल्यास नाक, तोंड व डोळ्याद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. कोणत्याही वस्तुला हात लावल्यावर कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आल्यास साबणाने तांत्रिक पद्धतीने हात धुन्याचे मार्गदर्शन भाग्यश्री या नित्यनेमाने करीत आहेत. कोणताही ताप अथवा सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे, डॉक्टरांकडे जाताना आपण आजारी असल्यास इतरांना संसर्ग होवू नये म्हणूनच मास्क वापरावे, अथवा मास्क वापरू नये असा सल्ला गावकऱ्यांना देत आहे. दरम्यान आपली रोगप्रतिकार शक्ती वाढल्यास कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.
त्यासाठी सकस आहार घेण्याचा सल्ला गृहभेटीतून त्यात देत आहेत. शासनाने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच संपूर्ण देशात कलम १४४ लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरातच राहावे, गर्दीच्या ठिकाणात जाण्याचे टाळावे तथा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सांगत आहे.

Web Title: Social activists fight for Corona ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.