शेतीचा जोडधंदा झाला उदरनिर्वाहाचे मुख्य साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:21+5:30

आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील शेतकरी भूवन सिताराम पाथोडे यांनी गोंदियातील एका सामाजिक संस्थेत १७ वर्ष काम केले. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करणे परवडत नसल्याने त्यांनी ती नोकरी सन २०१२ ला सोडली. नोकर म्हणून काम करताना आमगाववरून रेल्वेने सकाळी गोंदियाला येणे परत रात्री उशीरापर्यंत घरी जाणे या रोजच्या प्रकाराने ते कंटाळले होते.

The side business of agriculture became the main means of subsistence | शेतीचा जोडधंदा झाला उदरनिर्वाहाचे मुख्य साधन

शेतीचा जोडधंदा झाला उदरनिर्वाहाचे मुख्य साधन

Next
ठळक मुद्देदुसऱ्यांना देतो रोजगार : शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एका बहुउद्देशिय विकास संस्थेत तुटपुंज्या मानधनावर नोकरी करणाºया तरूणाने नोकरीचा नाद सोडून मालक होण्याचे स्वप्न बाळगले. परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरूवातीला शेतीचा आधार घेतला. शेतीला जोडधंदा म्हणून केलेल्या दुधाच्या व्यवसायातून त्याने आर्थिक प्रगती साधली. परिणामी नोकर म्हणून काम करण्यापेक्षा त्याने मालक म्हणून काम करणे पसंत केले.
आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील शेतकरी भूवन सिताराम पाथोडे यांनी गोंदियातील एका सामाजिक संस्थेत १७ वर्ष काम केले. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करणे परवडत नसल्याने त्यांनी ती नोकरी सन २०१२ ला सोडली. नोकर म्हणून काम करताना आमगाववरून रेल्वेने सकाळी गोंदियाला येणे परत रात्री उशीरापर्यंत घरी जाणे या रोजच्या प्रकाराने ते कंटाळले होते. शेवटी वडिलोपार्जीत शेतीत आपल्या शिक्षणाचा फायदा व्हावा, आपण नोकर म्हणून काम करण्यापेक्षा मालक म्हणून स्वत:च्याच शेतीत काम करण्याचा चंग बांधला.
शेतीच्या कामाला सुरूवातही केली. परंतु महिन्याकाठी खिशात येणारे पैसे शेतीत दर महिन्याला मिळत नसल्याने ते थोडे निराश झाले. परंतु दररोज किंवा महिन्याकाठी तरी पैसे खिशात यावे यासाठी त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करण्याचे ठरविले. म्हशी घेऊन त्यांना शेतातून चारून घरी आणणे, त्यानंतर आमगाव येथे जावून दूध विकण्यास सुरूवात केली. भूवन पाथोडे यांच्याकडे आजघडीला पाच म्हशी व दोन गाई आहेत. ही सात दुभती जनावरे दिवसाकाठी ४० लीटर रूपये दूध देतात. जनावरांपासून काढलेल्या दूधात कसलीही भेसळ नाही. त्यामुळे एका लिटरमागे ४० रूपयाने दूध लोक सहज खरेदी करतात. यातून त्यांना १६०० रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पत्करलेल्या हा दूध व्यवसाय त्यांच्या उपजिवीकेचा मुख्य साधन झाला.

शेतीचे उत्पन्न झाले बचत बँक
पारंपरिक धानाच्या शेती बरोबरच भाजीपाल्याची शेती देखील ते करतात. यंदा त्यांनी २ किलो वजनाच्या मुळ्याचे त्यांनी आपल्या शेतीत उत्पादन घेतला. वांगी, टोमॅटो, कांदे असे विविध भाजीपाला ते शेतातून घेतात. सोबतच रब्बी व खरीप अशी दोन पिके ते सहा एकर शेतीतून घेत असतात. दुधातून येणाºया मिळकतीतून घर चालविणे व शेतीतून येणाºया पैश्यातून शेती खरेदी करणे, लग्नसमारंभ, मुलांचे शिक्षण व उर्वरीत पैसे बचत म्हणून बँकेत जमा करतात. शेतीच्या कामासाठी ते गावातीलच काही लोकांना रोजगारही देतात. नोकरीचा नाद सोडून स्वत: मालक बनण्याचे स्वप्न पाहणारे भुवन पाथोडे आज गावात आदर्श शेतकरी म्हणून ओळखल्या जात आहेत.

Web Title: The side business of agriculture became the main means of subsistence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.