सात मुक्त तर सातची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:41+5:30

बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या आता २०५ वर पोहचली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये देवरी तालुक्यातील पुराडा येथील दोन रुग्ण आणि चिचगड येथील एक रुग्ण, गोंदिया शहरातील हनुमाननगर व सिव्हिल लाईन येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि आमगाव तालुक्यातील घाटटेमनी आणि तिगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Seven free and seven added | सात मुक्त तर सातची पडली भर

सात मुक्त तर सातची पडली भर

Next
ठळक मुद्दे२५७ कोरोना बाधितांची कोरोनावर मात : ९९३९ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.७) जिल्ह्यात पुन्हा सात कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. तर सात कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा सुध्दा मिळाला आहे.
आतापर्यंत एकूण २५७ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २०५ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.तर आतापर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांची संख्या ४९५ वर पोहचली आहे.
शुक्रवारी आढळलेल्या सात बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील दोन रुग्ण आणि शहरातील शास्त्री वॉर्डातील एक, सडक अर्जुनी येथील एक रुग्ण, आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील एक रुग्ण आणि तिरोडा तालुक्यातील बिरसी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या आता २०५ वर पोहचली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये देवरी तालुक्यातील पुराडा येथील दोन रुग्ण आणि चिचगड येथील एक रुग्ण, गोंदिया शहरातील हनुमाननगर व सिव्हिल लाईन येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि आमगाव तालुक्यातील घाटटेमनी आणि तिगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २५७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १० हजार ६१६ नमुने पाठविण्यात आले. यापैकी ४९५ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ९९३९ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. ८२ स्वॅब नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे. तर १४३ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.

गोंदियात आज आणि उद्या जनता कर्फ्यू
शहरात सातत्याने वाढत चाललेली कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेत गोंदिया शहरात शनिवारी (दि.८) व रविवारी (दि.९) जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या माध्यमातून कोरोनाची साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही स्थिती लक्षात घेता शहरात समूह संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेत प्रशासनाने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत दवाखाने, औषध दुकाने, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय तसेच वृत्तपत्रांचे वितरण सुरू साहील.

वृत्तपत्रांचे वितरण राहणार सुरू
गोंदिया नगर परिषदेने शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू घोषीत केला. यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. शासनाने वृत्तपत्रांचा यापूर्वीच अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या कालावधीत शहरातील सर्वच भागात वृत्तपत्रांचे नियमित वितरण होणार आहे. वृत्तपत्र वाचकांच्या घरी सुरळीतपणे पोहचणार आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी.

Web Title: Seven free and seven added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.