शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के अनुदानावरील बियाणे उपलब्ध

By admin | Updated: July 8, 2014 23:31 IST

अनेक दिवसांपासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट बघून जिल्हा परिषद प्रशासनाने दुबार पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर आठ क्विंटल

अधिकारी-पदाधिकाऱ्यांना निर्देश : एक एकर शेतजमिनीसाठी पाच किलो बियाणे देणार
गोंदिया : अनेक दिवसांपासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट बघून जिल्हा परिषद प्रशासनाने दुबार पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर आठ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. तसेच मागणीनुसार बियाण्यांचा पुरवठा केला जाईल, असे जि.प. कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी सांगितले आहे.
सोमवार (दि.३० जून) रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जि.प. चे अध्यक्ष विजय शिवणकर व कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी संबंधितांची तत्काळ बैठक बोलावली होती. यात जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याचे प्रमुख पीक धान असून त्यानुसार पाऊस पडणे गरजेचे होते. मात्र दोन आडवड्यांपासून पाऊस गायब झाले. पेरलेले बियाणे सडले तर पाण्याअभावी काही बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे सदर बैठकीत जर दोन दिवसात पाऊस पडले नाही तर जिल्हा परिषदेच्या निधीतून १० लाख रूपये खर्चून बियाणे खरेदी करण्यात येतील व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर वितरीत केले जातील, असा निर्णय घेण्यात आला होता.
जि.प. ने घेतलेल्या निर्णयानुसार, सध्या हलक्या वाणाचे आठ क्विंटल हायब्रिड बियाणे खरेदी करण्यात आले आहे. हे आठ क्विंटल बियाणे १५० एकर शेतीसाठी पर्याप्त असल्याचे कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी सांगितले आहे. एका एकरला पाच किलो बियाणे पुरतील. याशिवाय शेतकऱ्यांची जसजसी मागणी असेल तसतसे बियाण्यांची खरेदी करून त्यांचा पुरवठा केला जाईल. अतिरिक्त बियाणे खरेदी केले व शेतकऱ्यांनी त्या बियाण्यांची उचल केली नाही तर कंपनी खरेदी केलेले बियाणे परत घेत नाही. त्यामुळे सध्या आठच क्विंटल बियाणे जि.प. ने खरेदी केलेले आहे. मात्र शेतकऱ्यांची मागणी असल्यास आणखी बियाणे खरेदी करून ते ५० टक्के अनुदानावर वितरीत केले जातील, असा विश्वास कटरे यांनी व्यक्त केला.
सोमवार (दि.७) रोजी जि.प. च्या कृषी विभागात अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांना शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ५० टक्के अनुदानावर उपलब्ध झालेल्या या हलक्या जातीच्या हायब्रिड बियाण्यांचीच शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी उचल करावी, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)