शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:59 IST

राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.७) पासून संपावर गेले आहे. बुधवारी (दि.८) सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांचा संप कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि जि.प.शाळांमध्ये शुकशुकाट कायम होता.

ठळक मुद्देकर्मचारी भूमिकेवर ठाम : शासनातर्फे वाटाघाटी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.७) पासून संपावर गेले आहे. बुधवारी (दि.८) सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांचा संप कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि जि.प.शाळांमध्ये शुकशुकाट कायम होता.या संपात जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक सुध्दा सहभागी झाल्याने जि.प. शाळांना अघोषीत सुट्टी असल्याचे चित्र होते. या संपात ५३ संघटना व २५ हजारावर कर्मचारी सहभागी झाले आहे. संपात सहभागी विविध संघटनाच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शने केली. तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना दिले. तर जिल्हास्तरावर गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.या संपात जवळपास सर्वच विभागाचे राज्य सरकारी कर्मचारी सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी खोळंबले होते. तर शिक्षक सुध्दा यात सहभागी झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शुकशुकाट होता.बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कुठलाच तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांचा संप गुरूवारी (दि.९) कायम राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.शिक्षकांनी केले रक्तदानराज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात मंगळवारपासून राज्यभरातील कर्मचारी संपावर गेले आहेत. यात शिक्षक सहभागी झाले आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी संपात सहभागी शिक्षक एल.यू.खोब्रागडे, मजर शेख, लिलाधर तिबुडे, लिलाराम जसुजा, संदीप मेश्राम, मनोजकुमार रोकडे, रवि खोडे, चंद्रकांत खोडे या शिक्षकांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना फटकाविविध शासकीय कामासाठी गोंदिया येथे येणाऱ्या नागरिकांना राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बसला. सर्व कर्मचारी संपावर असल्याने त्यांना आल्यापावलीच परत जावे लागले.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप