शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाच्या कँटीनला केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी जाणाऱ्या पथकाने पूर्वी काही नगरसेवकांसह अन्य नेत्यांची फोन येत होते. परिणामी मालमत्ता कर वसुलीत अडथळा येत होता व यामुळेच मालमत्ता कराची थकबाकी व मागणी आजघडीला ११ कोटींच्या घरात गेली आहे. मात्र हा प्रकार मुख्याधिकारी करण चव्हाण यांना पचनी पडला नाही व त्यांनी कुणालाही न जुमानता मालमत्ता कर वसुली करण्याचे अन्यथा संबंधितांची मालमत्ता सील करण्याचे अधिकारच पथकाला देऊन टाकले आहे.

ठळक मुद्दे३.८८ लाखांची थकबाकी : सुटीच्या दिवशीही धडाका सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  मालमत्ता कर वसुलीला घेऊन कुणालाही न जुमानता सुरू असलेल्या कारवायांतर्गत कर वसुली पथकाने शुक्रवारी (दि.२५) शहरातील माजी नगरसेवक बटर पठाण यांच्या सुभाष बागेतील कॅंटीनला सील केले. त्यांच्यावर सन १९९७ पासून ३ लाख ३८ हजार रूपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. तर बाजार परिसरातील जैन फर्निचर संचालक यांनी लेखी स्वरूपात मालमत्ता कर भरण्याची हमी दिल्याने त्यांना २ दिवसांची मुदत देण्यात आली अन्यथा तेथेही सील ठोकण्याची पथकाने तयारी केली होती. शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी जाणाऱ्या पथकाने पूर्वी काही नगरसेवकांसह अन्य नेत्यांची फोन येत होते. परिणामी मालमत्ता कर वसुलीत अडथळा येत होता व यामुळेच मालमत्ता कराची थकबाकी व मागणी आजघडीला ११ कोटींच्या घरात गेली आहे. मात्र हा प्रकार मुख्याधिकारी करण चव्हाण यांना पचनी पडला नाही व त्यांनी कुणालाही न जुमानता मालमत्ता कर वसुली करण्याचे अन्यथा संबंधितांची मालमत्ता सील करण्याचे अधिकारच पथकाला देऊन टाकले आहे. मुख्याधिकाऱ्यांचाच पाठिंबा असल्यामुळे पथकही जोमात कामाला लागले असून आतापर्यंत शासकीय व खाजगी मालमत्तांनाही सील ठोकण्याचे सत्र शहरात सुरू आहे. यातूनच पथकाने शुक्रवारी (दि.२५) शहरातील माजी नगरसेवक पठाण यांच्या सुभाष बागेतील  कॉफी हाऊस या कॅंटीनवर धडक दिली. त्यांच्यावर ३ लाख ३८ हजार रूपयांची थकबाकी असून थकबाकी न भरल्यामुळे पथकाने कॅंटीनला सील केले. त्यानंतर पथकाने बाजारातील जैन फर्निचरचे संचालक राजेश जैन यांच्याकडे धडक दिली. त्यांच्यावर पाच लाख २० हजार रूपयांची थकबाकी असल्याने पथक सीलींगच्या तयारीतच होते. मात्र जैन यांनी कराचा भरणा करण्याची तयारी दर्शवून हमी पत्र दिल्याने कारवाई टळली. वसुली टाळण्यासाठी नेत्यांचे फोन सुरू मागील कित्येक वर्षांपासून शहरातील मोठे थकबाकीदार कर वसुली टाळण्यासाठी नेत्यांची मदत घेत आले आहेत. नेते मंडळी अधिकाऱ्यांना फोन करीत असल्याने वसुली टळत गेली व आज तीच चूक नगर परिषदेच्या अंगलट येत आहे. मात्र मुख्याधिकारी चव्हाण यांच्यावर फंडा काम करीत नसून त्यांनी जो नेता फोन करणार त्याच्यावर अगोदर कारवाई करा असा पवित्राच घेतला आहे. त्यानुसार पथक आता नेत्यांच्या फोनची वाट बघत असून जो फोन करेल त्याच्यावर अगोदर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :Taxकर