शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

दरवर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेवून तयार राहत असत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहावा म्हणून आदल्या दिवशी दिंडी काढून शाळा सुरु होण्याचा आनंद व्यक्त केला जात असे.

ठळक मुद्देशाळा सुरु करण्यास शासनाची द्विधास्थिती : संमतीपत्र देण्यास पालकांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : शाळा म्हटले की, विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक असतो. मात्र शाळेत एकही विद्यार्थी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांविना शाळा ओसाड दिसू लागल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांविना शाळा असे चित्र आजपर्यंतच्या इतिहासात घडले नाही असे मत शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या नागरिकांनी व्यक्त केले आहे.दरवर्षी पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जातो. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकासह सहायक शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेवून तयार राहत असत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहावा म्हणून आदल्या दिवशी दिंडी काढून शाळा सुरु होण्याचा आनंद व्यक्त केला जात असे. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व नवीन पुस्तके घेवून शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊल टाकण्याचा आनंद वेगळाच असायचा. त्यासोबतच इतरही वर्गांचे विद्यार्थी उत्तीर्ण होवून पुढच्या वर्गात गेले असल्याने त्यांचाही शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस अत्यंत आनंदाचा असायचा. परंतु यावर्षी परिक्षाविनाच पुढच्या वर्गात प्रवेश देण्याच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात असत. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सणासारखा असायचा, मात्र यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शाळेतील पहिल्या दिवसाच्या आनंदावर विरजन पडले आहे.राज्यात वाढत असलेल्या कोरोना बाधीतांची संख्या शहरी भागासारखीच ग्रामीण भागातही असल्यामुळे पालकांचा आक्रोश व चिंतेमुळे शासनाला १ जुुलै पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार शाळा-महाविद्यालयांना पालकांकडून संमतीपत्र घेण्यासबंधी सुचविले आहे. परंतु हमीपत्र देवून पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास सक्त विरोध दर्शवित असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागातील अधिकारी म्हणतात की, जेवढे विद्यार्थी शाळेत येतील तेवढ्याच विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करुन शाळा सुरु करावे अशी सूचना शाळा मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने परिपत्रक काढून गावातील शाळा इमारत सॅनिटाईज करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने स्विकारुन १४ व्या वित्त आयोगातील मंजूर निधी यासाठी खर्ची घालावे असे निर्देश आहेत. मात्र मुख्याध्यापक पत्र घेवून ग्रामपंचायतकडे जातात तेव्हा ग्रामपंचायत प्रशासन सॅनिटाईज करण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. अशा परिस्थितीत शाळा सुरु करुन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे होईल असेही पालकांना वाटत आहे. शाळा मुख्याध्यापकांची व्यवस्था करण्यात ताराबंळ होत आहे. या परिस्थितीचा विचार करता विद्यार्थी विना शाळा ओस पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :Schoolशाळा