शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नधान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:22 IST

परिसरातील बाक्टी, निमगाव, इंझोरी येथील रहिवासी असलेल्या मुलांवर जन्मदात्यांचे छत्र अचानक हिरावून गेल्याने

अनाथांना मिळतो आधार : सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : परिसरातील बाक्टी, निमगाव, इंझोरी येथील रहिवासी असलेल्या मुलांवर जन्मदात्यांचे छत्र अचानक हिरावून गेल्याने ऐन खेळण्या-बागडण्याच्या दिवसांमध्ये त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली. परिणामी मोठ्या काटकसरीने जीवन काढावे लागत आहे. वयोवृद्ध आजीच्या ममतेने काटेरी जीवनाशी सामना करावे लागत आहे. सामाजिक बांधिलकीची नाळ जुळली असल्याने लोकमतच्या बातमीने परिसरातील अनाथ मुलांना मदत करण्यासाठी समाजशील दानदाते पुढे येत आहेत. सामाजिक कार्यसाठी सदैव तत्पर असलेल्या प्रा. सविता बेदरकर यांच्या पुढाकारानी परिसरातील बाक्टी, इंझोरी येथील अनाथ झालेल्या बहिण-भावंना शालेय साहित्यासह किराणा व अन्नधान्याची घरपोच मदत करण्यात आली. बाक्टी व इंझोरी येथील आईवडिलांचे छत्र हिरावून अनाथ झालेले व मिलिंद विद्यालय चान्ना (बाक्टी) येथे विद्यार्जन करीत असलेल्या पोरक्या विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, प्राचार्य हेमंत राजगिरे, पर्यवेक्षक राजन बोरकर, उदाराम शेंडे उपस्थित होते. प्रा. सविता बेदरकर वेळोवेळी परिसरातील अनाथ मुलांना रोख रकमेसह गहू, तांदूळ व किराणा साहित्याचा पुरवठा करीत असतात. गोंदियाच्या साकेत पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांकडून तांदूळ, रमेश होतचंदानी ग्लॉस सेंटरकडून तेलाचा टिन, शिल्पा मटाले यांचे कडून किराणा, माजी जि.प. सभापती सविता पुराम यांच्याकडून एक हजार रूपये या प्रकारे साहित्य जमा करुन सविता बेदरकर यांनी लोकमतचे प्रतिनिधीकडे सुपूर्द केले. साहित्याचे वाटप मिलिंद विद्यालयाच्या पटांगणात डॉ. कुंदन कुलसुंगे यांच्या हस्ते अनाथ झालेले स्रेहा दिनेश मेश्राम, वीराज मेश्राम, सिमरन नाशिक सांगोळे, प्रज्वल सांगोळे, इंझोरीची काजल गोपाल शेंडे यांना शालेय साहित्य, तांदूळ, किराणा सामान वाटप केला. अन्नधान्य, शालेय साहित्य वाटपाप्रसंगी विद्यालयातील गिरीष बोरकर, तारेश माटे, लता उके, उषा लांडगे, पंडरी बोरकर, वासूदेव खूणे, जयेश भोवते, उके, सचिन राठोड, मंगेश दोनोडे, रामलाल लांडगे, भिमराव डोंगरे, रोकडे, व्ही.एफ. मेश्राम, दाजीबा राजगिरे, मदन सोनवाने, परिचर उके उपस्थित होते. संचालन राठोड, प्रास्ताविक अमरचंद ठवरे तर आभार जयेश भोवते यांनी मानले. लाभापासून वंचित गोंदिया : शासनाने शासकीय कार्यालयातील कामकाजामध्ये गती यावी, नागरिकांचे प्रश्न त्वरित सुटावे, सोबतच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कुलसुंगे यांनी केली ३ हजारांची मदत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे यांनी आपला खारीचा वाटा त्या अनाथांना लाभावा, अशी अपेक्षा करुन त्यांनी अन्नधान्याच्या वाटपाप्रसंगी तिन्ही कुटुंबातील अनाथांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे तीन हजार रुपये रोख दिले. त्यांनी सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडली. प्राचार्य हेमंत राजगिरे यांनी लोकमतच्या वृत्ताने अनाथ मुलांच्या जीवनात नवसंजिवणी निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाल्याने त्यांनी लोकमतचे आभार मानले.