Savarram's murder by hitting a throat and crushing a stone | गळा दाबून व दगडाने ठेचून सावलरामचा खून
गळा दाबून व दगडाने ठेचून सावलरामचा खून

ठळक मुद्देजादूटोण्याच्या संशयातून खून : पेट्रोल टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम चांदलमेटा येथील सावलराम सोमाजी उईके (४९) यांचा मृतदेह मंगळवारी (दि.५) चांदलमेटा येथील जंगल परिसरातील नकटा तलाव परिसरातील एका नालीत बांबूच्या झाडाजवळ आढळला होता. जादूटोण्याचा संशयातून त्याला पाच जणांनी मारहाण गळा दाबून व दगडाने डोक्यावर मारुन खून केला असल्याचे आता उघडकीस आले आहे.
सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम चांदलमेटा येथील सावलराम सोमाजी उईके हे मंगळवारी (दि.५) ग्राम ओवारा येथील प्रौढ कबड्डी पाहण्यासाठी जातो म्हणून घरुन गेले होते. रात्री घरी न परतल्याने त्यांची पत्नी वंदना सावलराम उईके (४३) यांंनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली. मात्र जादूटोण्याच्या संशयावरुन सावलरामचा यांचा काटा काढण्यासाठी आरोपी जयकुमार उर्फ पप्पू पन्नालाल परतेती (२१), हितेश गणेश परतेती (१९), गणेश गणपत परतेती (४५), किशोर शामलाल परतेती (४०) व समीर शिवचरण वलके (२९) यांनी ओवारा ते चांदलमेटा रस्त्यावर रात्री ८.३० वाजता अंधाराचा फायदा घेत सावलरामचा पाठलाग केला. त्यांना पकडून दिलीप सराटे यांच्या धानात ओढत नेले व गळा दाबून त्याला खाली पाडले तसेच दगडाने डोक्यावर मारुन खून केला.
या प्रकरणाची सर्व माहिती आरोपी हितेश परतेती व जयकुमार परतेती यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. यासंदर्भात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाचा ठिकाणी उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.

पेट्रोल टाकून मृतदेह जाळला
सावलरामचा गळा दाबून व दगडाने डोके ठेचून खून केल्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून तोंडावर व छातीवर पेट्रोल टाकून आग लावली. टोयाटोला येथील दिलीप सराटे यांच्या शेतापासून सुमारे ३ किमी. अंतरावर असलेल्या चांदलमेटा जंगल परिसरात नकट्या तलावाच्या अलीकडच्या नालीत बांबूजवळ मृतदेह लपवून ठेवला होता. अशी माहिती स्वत: आरोपींनी दिली आहे.

Web Title: Savarram's murder by hitting a throat and crushing a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.