शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, त्या बंधाऱ्यांत पाणी अडेल काय?

By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात मोठया प्रमाणात बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात एक थेंब पाण्याचा दिसत नाही.

सडक अर्जुनी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यात मोठया प्रमाणात बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात एक थेंब पाण्याचा दिसत नाही. नियोजनशून्य कारभाराचे हे फलीत असल्याचे मूर्त उदाहरण असून फक्त पैसा पाण्यात टाकण्याचा प्रकार तालुक्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या योजना चांगल्या असतात पण राबविणारी यंत्रणाच बरोबर नसल्यास योजनेचे तीन तेरा वाजायला वेळ लागत नाही.पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेत राज्यशासनाकडून राज्यात जलयुक्त शिवार योजना मोठ्या धडाक्यात राबविली जात आहे. कृषी विभाग, वन विभाग, लघु पाटबंधारे, सार्वजनिक पाटबंधारे आदी विभागांच्या माध्यमातून ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविला जात आहे. या योजनेंतर्गत कोट्यवधी रूपये खर्चून बंधारे बांधण्याचा धडका तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील डव्वा, सौंदड, हेटी, डोंगरगाव/डेपो, कोकणा/जमी., शेंडा, पांढरवाणी, जांभळी, कोसमतोंडी, पांढरी या परिसरात पाणी अडविण्यासाठी मोठमोठे बंधारे बांधले आहेत व सध्या बंधारे बांधण्याचा धडाका सुरूच आहे. मात्र पावसाळा निघून गेल्यावरही आजघडीला या बंधाऱ्यांत एकही थेंब पाणी अडल्याचे दिसून येत नाही.बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडविल्यास जमिनितील जलस्तर वाढणार. याचा मानवासह वन्यप्राण्यांनाही सहारा मिळणार. विशेष म्हणजे पाण्याची व सिंचनाची सोय होणार या मागचा मुख्य उद्देश आहे. मात्र पावसाचा लहरीपणा उलट परिस्थिती आणते. परिणामी शेतीसाठी भूगर्भातील पाण्याच्या उपसामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी जवळजवळ सर्वच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे काम होत आहे. यातूनच डव्वा परिसरात एकाच नाल्यावर पाच ते सात बंधारे बांधण्यात आले. अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे हे बंधारे बांधल्यामुळे त्या बंधाऱ्यांजवळ आजघडीला एकही थेंब पाणी नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जलयुक्त शिवार हा अभियान खऱ्या अर्थाने राबविल्यास तालुक्यातील शेतकरी ‘सुजलाम सुफलाम’ झाल्याशिवाय राहणार नाही. पण कोणताही अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे समस्या बिकट होताना दिसत आहे. अभियानाच्या नावावर अधिकारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त दिसतात, हे विशेष. त्यामुळे कोट्यवधींचा चुराडा करूनही पाणी दिसत नसल्याने आता एक अडाणीही साहेब, या बंधाऱ्यांत पाणी अडेल का असा टोमणा मारत आहे.