शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांसमोर नगराध्यक्षांनी मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:25 IST

नगर पंचायतच्या अध्यक्षा पौर्णिमा शहारे यांनी नगराच्या विकास कामात आडकाठी येत असल्याचे सांगून

विकास कामांत बाधा : शहराच्या विकासासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी मोरगाव : नगर पंचायतच्या अध्यक्षा पौर्णिमा शहारे यांनी नगराच्या विकास कामात आडकाठी येत असल्याचे सांगून त्यांनी विविध समस्यांचा पाढा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या समोर वाचला. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे (दि.१९) अर्जुनी मोरगाव येथे आले होते. नगर पंचायतच्या अध्यक्षा पौर्णिमा शहारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेतली. भेटीदरम्यान नगराध्यक्षा शहारे यांनी अर्जुनी मोरगाव नगराचा विकास करण्याच्या हेतूने नगर पंचायतच्या वतीने कामकाज करताना विविध अडचणी निर्माण येत असतात. आजघडीला नगर पंचायतला नियमित सेवा देण्यासाठी मुख्याधिकारी कायम स्वरुपी लाभले नाही. नगर पंचायतचा प्रशासकीय डोलारा चालविण्यासाठी नियमित कर्मचाऱ्यांचा अभाव सातत्याने भेडसावत आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नगराच्या विकास कार्यात अडचणी निर्माण होत आहे. हंगामी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याने अनेक समस्या नव्याने निर्माण होत आहे. नगर पंचायतचा कार्यभार सुरळीत चालल्याविण्या बरोबरच नगरातील जनसामन्यांच्या कामकाजाला गती देण्यासाठी नगरपंचायतला नियमित सेवा देणारे मुख्याधिकारी देण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनावर निर्णय द्यावा, अशी मागणी नगराध्यक्षा पौर्णिमा शहारे यांनी भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना केली.