शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गाळ््यांच्या फेरलिलावाला घेऊन पुन्हा घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

शहरात नगर परिषदेच्या मालकीचे १०७८ गाळे असून या गाळ््यांचा लिलाव होऊन नऊ वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटला आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व आद्योगीक नागरी अधिनियम १९६५ कलम ९२ (अ) अन्वये नगर परिषद आपली मालमत्ता ३ वर्षांकरिता भाड्याने देऊ शकते.

ठळक मुद्देकाही नगरसेवकांचा आक्षेप : नगर परिषदेकडून नोटीस वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या मालकीच्या १०७८ गाळ््यांच्या (दुकान) फेरलिलावाला घेऊन पुन्हा एकदा घमासान सुरू झाली आहे. नगर परिषदेने गाळेधारकांना गाळे रिकामे करण्यासाठी नोटीस बजावणे सुरू केले आहे. यावर मात्र काही नगरसेवकांनी नगर परिषद अर्थसंकल्पाच्या सभेत गोंधळ घालत यावर आक्षेप घेतला आहे. यामुळे नगर परिषदेत पुन्हा एकदा गाळ््यांचा चर्चेत आला आहे.शहरात नगर परिषदेच्या मालकीचे १०७८ गाळे असून या गाळ््यांचा लिलाव होऊन नऊ वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटला आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व आद्योगीक नागरी अधिनियम १९६५ कलम ९२ (अ) अन्वये नगर परिषद आपली मालमत्ता ३ वर्षांकरिता भाड्याने देऊ शकते. त्यानंतर भाडे पट्याचे नुतनीकरण करून ६ वर्षांपर्यत म्हणजे एकूण ९ वर्षांपर्यंत आपले गाळे भाड्याने देऊ शकते अशी तरतूद आहे. त्यानुसार, आता या गाळ््यांचा फेरलिलाव करता येणार आहे.नगर परिषदेच्या २४ डिसेंबर २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक १६ अंतर्गत हा विषय मांडण्यात आला होता. त्यातही सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हा नगर परिषद कामकाजाचा भाग असल्याने त्यांना ते करावे लागणार असे स्पष्ट केले होते. त्यानंतर, आता नगर परिषदेने गाळ््यांचा फेरलिलाव करता यावा यासाठी गाळेधारकांना गाळे रिकामे करून ताबा परत द्यावा असे नोटीस बजावण्यास सुरूवात केली आहे.यावर नगर परिषदेच्या अर्थसंकल्प सभेत काही नगरसेवकांनी याचा विरोध दशर्विला. परिणामी, सध्या गाळे फेरलिलावाचा विषय सध्या नगर परिषदेत चांगलाच चर्चेत आहे.सुमारे ३५० नोटीस वितरीतनगर परिषद बाजार विभागाकडून गाळेधारकांना ११ फेब्रुवारीपासून नोटीस दिले जात असून आतापर्यंत सुमारे ३५० नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे. त्यात आता मधातच गाळे फेरलिलावाच्या विषयावर सभेत गोंधळ झाल्याने बाजार विभाग अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे, नोटीस देण्यासाठी जात असलेल्या कर्मचाऱ्याला गाळेधारक धमकावत असल्याचेही खुद्द बाजार विभागातील अधिकारी-कर्मचारी सांगत आहेत. शिवाय, या प्रकरणात आता राजकारणही मधात टाकले जात असल्याचे दिसत आहे.असे आहेत नगर परिषदेचे गाळेनगर परिषद मालकीच्या गाळ््यांची ठराविक पाहणी केल्यास गंज बाजारात १५६, नवीन कपडा लाईन ६५, टाऊन स्कूल ३२, नाई लाईन २१, हायल मार्केट ८८, लोहा शेड २०, जाली शेड पहिला मजला २६, जाली शेड तळ माळा ३३, व्यापार संकुल जुने बस स्थानक २१, मनोहरभाई मार्केट फुटपाथ ६१, इंदिरा गांधी स्टेडियम ५९, रामनगर शॉपींग सेंटर ४२, कच्च्या दुकानी व ओटे ३५९ गाळे असून यासह शहरात अन्य ठिकाणांवर नगर परिषद मालकीचे गाळे असून अशाप्रकारे एकूण १०७८ गाळे आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका