शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांना पाठवले आल्यापावली परत

By admin | Updated: November 13, 2015 01:49 IST

शेंङा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे देना बँकेची शाखा आहे. या शाखेत निराधारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या वृद्धापकाळ योजनेच्या पैशाचे वाटप केले जाते.

दिवाळी अंधारात : शेंडा येथील देना बँकेतील प्रकारशेंङा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे देना बँकेची शाखा आहे. या शाखेत निराधारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या वृद्धापकाळ योजनेच्या पैशाचे वाटप केले जाते. परंतु ऐन दिवाळीसारख्या सणानिमित्त पैसा प्राप्त झाला नसल्याचे कारण पुढे करून त्यांना आल्यापावली परत पाठविण्यात आले. त्यामुळे निराधारांची दिवाळी अंधारातच गेल्याची ओरड आहे.सडक-अर्जुनी येथील को-आॅपरेटिव्ह बँकेतील निराश्रित खातेदारांना दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले. त्यामुळे आपल्यालाही पैसे मिळतील, या आशेने शेंडा येथील देना बँकेसमोर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बँक उघडताच उपभोक्त्यांनी गर्दी केली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तुमचे पैसे आलेच नाही, असे सांगताच त्यांची तारांबळ उडाली. आरडाओरड सुरू होवून आल्यापावली त्यांना परत जावे लागले. काहींनी बँक कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले.विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निराधारांचे दोन महिन्यांचे वेतन तहसील कार्यालयाकडून बँकेला पाठविण्यात आले. को-आॅपरेटिव्ह बँक सडक-अर्जुनी शाखेने ते पैसे वाटपही केले. परंतु देना बँकेने पैसे आलेच नाही, त्यामुळे तुम्ही परत जा, असे सांगताच निराश्रितांवर दिवाळीसारख्या सणाचे विरजन पडले.या गावातील देना बँकेची शाखा आठवड्यातून फक्त दोनच दिवस उघडते. बँक उघडण्याची वेळ मात्र निश्चित नसल्याने कधी २ वाजता, कधी ३ वाजता किंवा कधी ४ वाजता उघडते. त्यामुळे नियमित ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठांचे या शाखेकडे लक्ष नसल्याने काम होईलच, याची हमी नाही. या गावची शाखा बँक कर्मचाऱ्यांच्या मनमर्जीने चालते. त्यामुळे ‘हम करे सो कायदा’ असा प्रकार सुरू आहे.सदर बँकेच्या कार्यशैलीची व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत चौकशी करण्याची मागणी आहे.तरी वरिष्ठांनी जातीने लक्ष पुरवून खातेदारांवर अथवा निराश्रितांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. (वार्ताहर)