शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

औषधीचा पुरवठा वेळीच न झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी

By admin | Updated: September 18, 2014 23:37 IST

शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शनाकरिता शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी औषधाचा पुरवठा होणे आवश्यक असते. मात्र यावर्षी कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषधाचा

काचेवानी : शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शनाकरिता शासनाचा कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकऱ्यांना योग्यवेळी औषधाचा पुरवठा होणे आवश्यक असते. मात्र यावर्षी कीटकनाशक आणि बुरशीनाशक औषधाचा पुरवठा कृषी विभागाने न केल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळी आणि मावा-तुडतुडा पसरण्याची भीती आहे. आतापर्यंत करपा आणि खोडकिडा धानपिकावर दिसत होता. परंतु शेतकऱ्यांनी प्रयत्न करून या रोगाचे प्रमाण कमी केले. यावेळी लष्करी अळी व मावा-तुडतुडा काही प्रमाणात दिसून येत आहे. त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून कृषी विभागाकडून अद्याप औषधाचा पुरवठा करण्यात आला नाही. कृषी विभागाकडून कमी दरात औषधी मिळणार अशी यावर्षीही शेतकऱ्यांना आशा होती. मात्र आतापर्यंत औषध पुरविण्यात आली नाही. शेतकऱ्यांची यावेळी आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने बाजारातून औषधाची खरेदी कशी करावी? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सप्टेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापासून हलक्या धानाच्या लोंबा निघणे सुरू झाल्या आहेत. यावेळी मावा-तुडतुडा आणि लष्करी अळीचा प्रकोप असतो. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरण आणि दिवसा येणाऱ्या पावसाच्या सरी फुलाव्यावर असणाऱ्या धान्याला नुकसानकारक ठरू शकतात. नैसर्गिक बदलामुळे यावर्षी पाहिजे तसे धानपीक उठल्याचे दिसून येत नाही. गेल्या १५ ते २० दिवसात धानाची वाढ हवी तशी झालेली नाही. तिरोडा कृषी विभागाने औषधाची मागणी केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांना औषधाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे आधीच आर्थिक तंगी सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पीक होईल किंवा नाही, ही चिंता सतावत आहे. शेतकरी वर्गाला शासन किंवा संबंधित विभागाने मोकळ्या मनाने कोणत्याही सुविधा, योजना किंवा मदत दिलेली नाही, असाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)