शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई द्या

By admin | Updated: December 27, 2015 02:19 IST

मालाची वाहतूक करताना अचानक आलेल्या पावसामुळे मालाची हाणी होऊन तो माल वापरण्याच्या लायकीचा राहिला नाही.

जिल्हा ग्राहक मंचचा निकाल : पावसामुळे झाला होता माल खराबगोंदिया : मालाची वाहतूक करताना अचानक आलेल्या पावसामुळे मालाची हाणी होऊन तो माल वापरण्याच्या लायकीचा राहिला नाही. पण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने त्या नुकसानीची भरपाई देण्यास नकार दिला. शेवटी जिल्हा ग्राहक मंचाने माल वाहतूकदाराचा दावा ग्राह्यधरत त्यांना नुकसानभरपाईची रक्कम देण्याचा आदेश दिला.गोंदिया तालुक्यातील तामखेडा येथील शिवशंकर भगवानदास खंडेलवाल यांनी आपल्या बालाजी अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स या फर्मचा आठ लाखांचा विमा काढला होता. त्या पॉलिसीच्या नियमान्वये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी त्यांच्या फर्ममार्फत पाठविण्यात येणाऱ्या मालाच्या नुकसानभरपाईचा खर्च देण्यास बांधील होती. दि.८ नोव्हेंबर २००९ रोजी सदर फर्मने गोंदियातून पनवेल (मुंबई) येथे १५०० गोणी तांदूळ पाठविला होता. त्या मालाच्या वाहतुकीपोटी ४२ हजार रुपयांचा खर्च खंडेलवाल यांनी न्यू दरबार रोडवेज या वाहतूकदार फर्मकडे दिला होता. मात्र प्रवासादरम्यान अवकाळी पाऊस आला आणि त्यांचा माल पावसाने ओला झाला. त्यामुळे खंडेलवाल यांनी नुकसान भरपाई म्हणून ४ लाख २१ हजार ७०८ रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे मागितली. परंतु कंपनीने तो दावा फेटाळून लावला. वास्तविक विमा कंपनीने पाठविलेल्या सर्व्हेअरच्या अहवालानुसार नुकसान भरपाईपोटी १ लाख ८० हजार ६०० रुपयांची रक्कम मिळण्यास पात्र ठरविण्यात आले होते. परंतू हा दावा कंपनीने दिला नसल्यामुळे खंडेलवाल यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे दाद मागितली. मंचाने सर्व बाजू ऐकून आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ओरिएंटल विमा कंपनीने सर्व्हेनुसार १ लाख ८० हजार ६०० रुपये नुकसान भरपाई तसेच तक्रारकर्त्यास मानसिक त्रासपोटी ३ हजार रूपये तसेच तक्रारीचा खर्च अदा करण्याचे आदेश दिले. हा निकाल जिल्हा ग्राहक न्यायमंचचे अध्यक्ष अतुल दिनकर आळशी आणि सदस्य वर्षा पाटील यांनी दिला. (जिल्हा प्रतिनिधी)