शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतींना ‘रेफर टू नागपूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

ती दहशत कमी करण्याची जवाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे तेच डॉक्टर कोरोनाच्या नावावर गोंदियाच्या गर्भवतींना रेफर टू नागपूर करीत आहे. त्यामुळे गोरगरिबांनी काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थितीत केला आहे. लोकांच्या आरोग्यासंबधी अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी । कोरोनाच्या नावावर गर्भवतींना भरती करण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वत्र कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असला तरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या लोकांना तातडीची सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब गर्भवतींना प्रसूतीसाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणल्यावर त्यांना रेफर टू नागपूर केले जाते असल्याची ओरड वाढली आहे.गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यात तेवढी जनजागृती नाही. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक दहशतीत आहेत.ती दहशत कमी करण्याची जवाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे तेच डॉक्टर कोरोनाच्या नावावर गोंदियाच्या गर्भवतींना रेफर टू नागपूर करीत आहे. त्यामुळे गोरगरिबांनी काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थितीत केला आहे. लोकांच्या आरोग्यासंबधी अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे.कोरोनाला घेऊन सगळीकडेच विदारक स्थिती असतानाही अत्यंत आवश्यक असलेल्या रूग्णांचा उपचार करणे आवश्यक आहे.परंतु गंगाबाई स्त्री रूग्णालयात असे होताना दिसत नाही.कोरोनाच्या नावावर गर्भवतींना रेफर करणाऱ्या डॉक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सूचना देण्याची गरज आहे.खासगी डॉक्टरांचे दवाखाने बंदचनेहमीच गोंदिया जिल्हावासीयांकडून उपचाराच्या नावावर श्रीमंत होणारे बहुतेक डॉक्टरांनी संकटाच्या काळात आपल्या दवाखाने बंद करून ठेवले आहेत. खासगी दवाखाने सुरू ठेवण्याची गरज असताना खासगी डॉक्टरांनी आपले दवाखने बंद केले आहेत. काही डॉक्टरांनी खूप विनंती केल्यावर आधी रूग्णांची सखोल चौकशी केल्यानंतरच उपचार करणार किंवा नाही असा डॉक्टरांचा पवित्रा आहे. या संकटाच्या काळात माणुसकीच्या नात्याने खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडे करण्याची गरज आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय महाविद्यालय तसेच महिला आणि बालकांसाठी स्वतंत्र बाई गंगाबाई महिला रुग्णालय स्थापन करण्यात आले. मात्र सध्या कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असताना बीजीडब्ल्यू रुग्णालयातील डॉक्टर गर्भवती महिलांना रेफर टू नागपूर करीत आहे. हा प्रकार मागील आठवडाभरापासून सुरू असून याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना देण्याची गरज आहे.- दिलीप बन्सोड, माजी आमदार.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटल