शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिप्रदर्शनासाठी ‘रेडिमेड कार्यकर्ते’

By admin | Updated: September 29, 2014 00:46 IST

विधानसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून प्रचार मोहीमेत आपली शक्ती अधिक आहे हे दाखविण्यासाठी अनेक उमेदवारांचा खटाटोप सुरू आहे. मात्र शक्ती प्रदर्शनात

बालकांचाही वापर : मजुरांना आणण्यासाठीही दिला जातो कंत्राटगोंदिया : विधानसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून प्रचार मोहीमेत आपली शक्ती अधिक आहे हे दाखविण्यासाठी अनेक उमेदवारांचा खटाटोप सुरू आहे. मात्र शक्ती प्रदर्शनात अधिक गर्दी करण्यासाठी ‘रेडिमेड कार्यकर्ते’ आणले जात आहे. हे रेडिमेड कार्यकर्ते पुरविणारे काही कंत्राटदारसुद्धा सक्रिय झाले आहेत.उमेदवारांचा खर्च वाढतो याकडे मात्र निवडणूक आयोगाचे लक्ष नाही. उमेदवार मजूरांना सरळ मजूरी न देता त्यांच्या गावातील आपल्या संबंधित व्यक्तीला ही मजुरी देतात. ते व्यक्ती आपापल्या गावातील मजूरांना त्यांच्या घरापर्यंत मजूरी पोहचवून देतात. आचारसंहितेचा भंग होऊ नये, आपल्यावर अधिक खर्च केल्याचा ठपका पडू नये यासाठी नियमाच्या आतच खर्च करण्याचा निव्वळ देखावा काही उमेदवारांकडून करण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी विविध गावातील मजुरांना गोळा करून महिलांना १०० ते १५० रूपये, पुरूषांना २०० रूपये व लहान मुलांना ५० रूपये रोज देण्यात येत असल्याची विश्वसनिय माहिती अनेक मजुरांनी नाव न सांग्याच्या अटीवर दिली आहे. गोंदियाच्या संजय नगरातील एका बालकाने ५० रूपये मजुरीवर तीन तासासाठी आपण आपल्या मित्रांसोबत एका मिरवणुकीत गेल्याचे सांगितले. निवडणुकीचा खर्च लपविण्यासाठी मजूरांना देण्यात येणारी मजुरी उमेदवार संबंधित गावातील सरपंच किंवा त्या गावातील आपल्या सक्रिय कार्यकर्त्याकडे सोपवितात. काही ठिकाणी विशिष्ट कंत्राटदारच ही जबाबदारी घेत आहे. नामांकन दाखल करण्यापासून निवडणुकीच्या प्रचारापर्यंत अनेक मजूर आज एका उमेदवाराच्या तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या उमेद्वाराच्या रॅलीत सहभागी होत असतो. आपल्याला कोण मजुरी अधिक देईल याकडे त्यांचे लक्ष असते. (तालुका प्रतिनिधी)